महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीत अजब प्रकार..! संभाव्य कोरोना रुग्णाचा स्वॅब घेऊन रुग्णास पाठवतात घरी - अमरावती कोरोना अपडेट

अमरावतीमध्ये ज्या व्यक्तीचा स्वॅब घेतला जातो त्याला घरी पाठवले जाते. स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर संबंधित व्यक्तीला कोविड रुग्णालयात दाखल केले जाते आणि त्याच्या संपर्कातील व्यक्तींना विलगिकरण कक्षात हलविण्यात येते.

amravati covid 19
अमरावतीत अजब प्रकार..! संभाव्य कोरोना रुग्णाचा स्वॅब घेऊन रुग्णास पाठवतात घरी

By

Published : Jun 5, 2020, 9:17 AM IST

अमरावती - शहरात वलगाव, पठाण चौक या परिसरारसह डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय, मार्डी मार्गावर गोडे अभियांत्रिकी महाविद्यालय, सिपना अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय मुलींचे वसतिगृह, नावसारी येथील शासकीय वसतिगृह अशा विविध ठिकाणी विलगिकरण कक्ष निर्माण करण्यात आले आहेत. असे असताना ज्या व्यक्तीचा स्वॅब घेतला जातो त्याला घरी पाठवले जाते. स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर संबंधित व्यक्तीला कोविड रुग्णालयात दाखल केले जाते आणि त्याच्या संपर्कातील व्यक्तींना विलगिकरण कक्षात हलविण्यात येते.

अमरावतीत अजब प्रकार..! संभाव्य कोरोना रुग्णाचा स्वॅब घेऊन रुग्णास पाठवतात घरी

अमरावती विभागातील अकोला शहरात मात्र ज्या व्यक्तीचा स्वॅब घेतला जातो त्याला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील विलगिकरण कक्षात त्वरित हलविण्यात येत आहे. अमरावतीत स्वॅब चाचणीसाठी दिल्यावर अहवाल किती दिवसाता प्राप्त होईल याची शाश्वती नसल्याने स्वॅब देणारे काही महाभाग घरात न बसता गावभर फिरत आहेत.

शहरातील वडाळी परिसरात एक व्यक्ती बुधवारी दिवसभर परिसरात फिरत होता. शेजारच्या दुकानातून त्याने किराणा नेला. तसेच एका ठिकाणी सुरू असणाऱ्या बांधकामाची चौकीदारी करायलासुद्धा तो दोन दिवस आधीपर्यंत गेला होता. त्यानंतर त्याच्या घरासमोर अचानक बुधवारी सायंकाळी महापालिकेचे आरोग्य पथक धडकले. त्याचा स्वॅब चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने हे पथक वडाळी परिसरात पोहोचले. सुदैवाने तो घरीच असल्याने त्याला उपचारासाठी कोविड रुग्णालयात नेण्यात आले. यापूर्वी अहवाल प्राप्त होताच दसरा मैदान परिसरात कोरोना रुग्ण चक्क तीन तास परिसरात फिरत होता.

दरम्यान, ज्या व्यक्तींचा स्वॅब तपासण्यासाठी घेणार येतो त्या व्यक्तींना असे मोकळे कसे काय सोडण्यात येत आहे? संभावित कोरोना रुग्णांना घरी पाठविण्यात येत असताना शहरातील इतके सारे विलगिकरण कक्ष नेमके कशासाठी आहेत असा प्रश्नही उपस्थित होतो आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details