अमरावती -विद्यार्थ्यांना बाहेर काढून शिक्षक दारूच्या नशेत वर्गत झोपत असल्याचा संतापजनक प्रकर मंगळवारी चिखरदरा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत गावखऱ्यांनी उघडकीस आणला. शिक्षकच वर्गात दारू पिऊन लोळत असल्याचा संतापजनक प्रकार ईटीव्ही भारत ने दाखवला. या नंतर जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन होण्यास हा शिक्षण कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत नामदेव मेश्राम या नशेखोर शिक्षकाच्या निलंबनाचे आदेश शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रामभाऊ तुरणकर यांनी काढले.
शाळेच्या वर्गातच दारू ढोसून लोळणाऱ्या 'त्या' दारुड्या शिक्षकाचे निलंबन - alcohol
गेल्या महिन्यात २७ तारखेला नामदेव मेश्राम हा दारूडा शिक्षक शाळेत रुजू झाला होता. वर्गातील विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढून हा दारूडा वर्गखोलीत लोळत होता.पालकांनी शाळेत जाऊन बघितले असता हा दारूडा शिक्षक वर्गखोलीत दारूच्या नशेत झोपलेला आढळून आला.
![शाळेच्या वर्गातच दारू ढोसून लोळणाऱ्या 'त्या' दारुड्या शिक्षकाचे निलंबन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3820433-301-3820433-1562933509769.jpg)
अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यातील गौलखेडा बाजार ग्रामपंचायत अंतर्गत मांजरकापडी गाव येते. याठिकाणी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा आहे. यामध्ये एकूण २९ विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक रुजू झाले आहेत. त्यापैकी गेल्या महिन्यात २७ तारखेलाच नामदेव मेश्राम हा दारूडा शिक्षक रुजू झाला होता. वर्गातील विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढून हा दारूडा वर्गखोलीत लोळत होता. पालकांनी शाळेत जाऊन बघितले असता हा दारूडा शिक्षक वर्गखोलीत दारूच्या नशेत झोपलेला आढळून आला. यामुळे संतापलेल्या पालकांनी या शिक्षकावर लवकरात लवकर कारवाई करण्याची विनंती केली होती. त्यानंतर आज या शिक्षकाच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले.