महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीत साहेबा बारमधील वेटरचा संशयास्पद मृत्यू - Suspected death of waiter

नितीन दादाराव वडतकर (वय 42) असे त्या वेटरचे नाव असून ही घटना रविवारी उघडकीस आली.

amravati
साहेबा बारमधील वेटरचा संशयास्पद मृत्यू

By

Published : Dec 23, 2019, 9:36 AM IST

अमरावती- जिल्ह्यातील कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंजनसिंगी ते कौंडण्यपूर रोडवर साहेबा वाईन बार अँड रेस्टॉरंटमधील वेटरचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. नितीन दादाराव वडतकर (वय 42) असे त्या वेटरचे नाव असून ही घटना रविवारी उघडकीस आली.

हेही वाचा -बालाजी नगर परिसरात चोरट्यांनी फोडले घर; १५ दिवसात दुसरी घटना

बारचा मॅनेजर गिते यांनी बार उघडल्यानंतर वेटर नितीनचा शोध घेतला. त्यावेळी नितीन कुठेही दिसत नसल्यामुळे त्यांनी बाथरूम उघडण्याचा प्रयत्न केला. तिथे वेटर नितीनचा मृतदेह आढळला.

त्यानंतर याची माहिती स्थानिक पोलीस स्टेशन कुऱ्हा यांना देण्यात आली. पोलीस अधिकारी सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार सुनील वाघमारे यांनी शेताचा पंचनामा करून मृतदेह तपासणीसाठी धामणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. नितीन वडतकर याचा मृत्यू नक्की कशाने झाली की हा घातपात आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details