अमरावती- सोमवारी अमरावतीच्या तिवसा तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अशातच तिवसा तालुक्यातील शेंदूरजना बाजारवरून वाहणाऱ्या सूर्यगंगा नदीला पूर आल्याने पाणी पुलावरून वाहत आहे. त्यामुळे तिवसावरून कुऱ्हाकडे होणारी वाहतूक खोळंबली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील सूर्यगंगा नदीला पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला - suryaganga
अमरावतीच्या तिवसा तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपल्याने सुर्यगंगा नदीला पूर आला आहे. पाणी पुलावरून वाहत असल्याने तिवसावरून कुऱ्हाकडे होणारी वाहतूक खोळंबली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील सुर्यगंगा नदीला पूर
शेंदूरजना बाजार येथे सूर्यगंगा नदीच्या पुलाचे सध्या बांधकाम सुरू आहे. त्यामुळे पर्यायी पुलाची बांधणी करण्यात आली. परंतु, पुलाची उंचीही कमी असल्याने पुराचे पाणी हे पुलावरून वाहत आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. विशेष म्हणजे मागील आठवड्यात या पुलाचा काही भाग वाहून गेला होता.