महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बाप रे बाप! अर्धाकोटी किंमतीचा रेडा 'सुल्तान'ने वेधलं अमरावतीकरांचं लक्ष - अमरावतीकरांचे लक्ष

Sultan Male Buffalo : अमरावतीत भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. (Amravati Agricultural Exhibition) या ठिकाणी आयोजित पशु प्रदर्शन मेळाव्यात 'सुल्तान' नावाचा रेडा नागरिकांचं लक्ष वेधून घेताेय. मालकाने या रेड्याची विक्री किंंमत 51 लाख रुपये ठेवली आहे. 30 डिसेंबर पर्यंत हे प्रदर्शन सुरू असणार आहे.

Sultan Male Buffalo
'सुल्तान'ने वेधले अमरावतीकरांचे लक्ष

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 29, 2023, 7:56 PM IST

सुल्तान रेड्याविषयी माहिती देताना मालक

अमरावतीSultan Male Buffalo : भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त अमरावतीमध्ये राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातील पशुधन, प्रदर्शनासाठी अमरावतीत दाखल झालं आहे. (Animal Exhibition) अहमदनगर जिल्ह्यातून आलेल्या 'सुल्तान' नावाच्या रेड्यानं मात्र अमरावतीकरांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या रेड्याची किंमत थोडी थोडकी नव्हे तर 51 लाख रुपये आहे. रेड्याची ही किंमत ऐकून अमरावतीकरांच्या मात्र भुवया उंचावल्या आहेत.


पंचक्रोषित रेड्याची चर्चा :जगात पाळीव प्राण्यांच्या अनेक जाती, प्रजाती आढळतात. त्यातील काही प्रजाती खूपच महाग असतात. सध्या एका रेड्याच्या एवढ्या किमतीची अमरावतीमध्ये चांगलीच चर्चा होत आहे. ही किंमत ऐकून तुम्ही चकित झाल्याशिवाय राहणार नाही. रेड्याच्या किमतीचा एवढा मोठा आकडा ऐकल्यावर तुम्हाला थोडं विचित्र वाटेल; पण सध्या अमरावतीसह पंचक्रोशीत या रेड्याची जोरदार चर्चा आहे. अमरावतीत सुरू असलेल्या राष्ट्रीय कृषी व पशू मेळाव्यात देशातील विविध राज्यांतील शेतकरी आपली जनावरं घेऊन आले आहेत. त्या गर्दीत मात्र 'सुलतान'ची चर्चा आहे. मुऱ्हा जातीच्या असलेल्या रेड्याचे वजन ११०० किलो आहे. तर त्याचे वय ५ वर्ष ३ महिने आहे.


दिवसाला सुल्तानला लागतो एवढा आहार :अकराशे किलो वजन असलेल्या सुलतानला भरभक्कम आहार लागतो. ५ किलो शेंगदाणा पेंड, ५ किलो सरकी, १० लिटर दूध, २५ अंडी, हिरवा चारा, ऊस, गवत, मका असा भरपूर आहार लागतो. त्याच्या खाद्यासाठी दिवसाला दोन हजार रुपये खर्च येत असल्याचं रेड्याचे मालक पोपट श्रीधर गिरवले यांनी सांगितलं.


सुल्तान देशात दुसरा तर राज्यात पहिला :महाराष्ट्र शासन आयोजित महा पशुधन एक्स्पो २०१३ मध्ये सुलतानचा देशात द्वितीय तर महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक आला आहे. 'सुल्तान'चे मालक पोपट श्रीधर गिरवले यांनी त्याची खूप काळजी घेतली आहे. दरम्यान, हे कृषी प्रदर्शन ३० डिसेंबरपर्यंत सुरू राहील. उभी पीक, पशु प्रदर्शन, पुष्प प्रदर्शन, खाद्य बाजार आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सलग ४ दिवसांपासून अमरावतीकरांना अनुभवण्यास मिळत आहे.


२७ ते ३० डिसेंबर पर्यंत राहणार कृषी प्रदर्शन :शेतकऱ्यांचे कैवारी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी पहिल्या जागतिक कृषी प्रदर्शनाचे आयोजन १९५९-६० मध्ये दिल्ली येथे केले होते. ही प्रेरणा घेऊन श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या भव्य प्रक्षेत्रात आयोजित ४ दिवसीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंती निमित्तानं केले जात आहे. दि. २७ ते ३० डिसेंबर, २०२३ रोजी श्री शिवाजी कृषी महाविद्यालय मोर्शी रोड, अमरावती येथे करण्यात आले आहे.

हेही वाचा:

  1. मुंबईत ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष पेटणार? आंदोलनाच्या परवानगीसाठी दोन्ही समाजाचे शिष्टमंडळ मायानगरीत
  2. प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर दिसणार का महाराष्ट्राचा चित्ररथ? प्रशासनानं दिलं 'हे' उत्तर
  3. जरांगेंच्या उपोषणाच्या पूर्वीच मराठा समाजाला आरक्षण मिळणार - हसन मुश्रीफ यांचा दावा

ABOUT THE AUTHOR

...view details