अमरावती- गेल्या अनेक दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण असताना बुधवारी सायंकाळपासून पाऊस पडायला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे मात्र, अमरावतीकरांची चांगलीच तारांबळ उडाली.
अमरावती शहरात अचानक पाऊस; नागरिकांची चांगलीच तारांबळ - अमरावती पाऊस न्यूज
गेल्या अनेक दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण असताना बुधवारी सायंकाळपासून पाऊस पडायला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे मात्र, अमरावतीकरांची चांगलीच तारांबळ उडाली.
![अमरावती शहरात अचानक पाऊस; नागरिकांची चांगलीच तारांबळ rain in amravati](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5492560-953-5492560-1577285270427.jpg)
हेही वाचा - माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथे भीषण अपघात; बापलेकीसह तिघांचा मृत्यू
गेल्या काही दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण असताना बुधवारी सायंकाळी सात वाजल्यापासून पाऊस कोसळायला सुरुवात झाली. या ढगाळ वातावरणामुळे डिसेंबर महिन्यात अमरावती शहर आणि जिल्ह्यातील थंडी कमी झाली होती. मात्र, ऐन नाताळच्या दिवशी अचानक आलेल्या पावसाचा आयोजित कार्यक्रमांवर परिणाम झाला. शहरात नाताळ निमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रम आयोजीत करण्यात आले होतो. या पावसामुळे मात्र, आयोजकांची ऐनवेळी तारांबळ उडाली. शहरातील बडनेरा, साईनगर, नवाथे चौक या परिसरात मुसळधार पाऊस कोसळला असून राजकमल चौक, इर्विन चौक, कॅम्प परिसर या भागात पावसाच्या सरी बरसत आहे. दरम्यान, शहरात दोन दिवस पाऊस पडेल अशी हवामान खात्याने शक्यता आधीच वर्तविली होती.