अमरावती - अमरावती शहरापर्यंत कोरोना धडकला असला तरी जिल्ह्याच्या ठिकाणी कोरोना विरोधातील लढ्यात चार हात करत आहेत. जिल्ह्याच्या भातकुली तालुक्यातील सावरखेड या गावात कोरोनाविरुद्ध जनजागृती करण्यासाठी वालगाव येथील संत गाडगेबाबा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सारसावल्याचे पाहायला मिळाले. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सतत हात धुवा, स्वच्छता राखा, असा संदेश हे विद्यार्थी ग्रामस्थांना देत आहेत. ग्रामस्थही याचा सकारात्मक प्रतिसाद देत असून सावरखेड कोरोनापासून दूर असल्याचे चित्र दिसत आहे.
हात नेमके कसे धुवायचे याचे प्रात्यक्षीकही विद्यार्थी गावातील वृद्धांना करून दाखवत आहेत. महिनाभरापासून विद्यार्थ्यांनी केलेल्या जनजागृतीचा परिणाम गावात दिसतो आहे. गवात कोणीही तोंडाला मास्क न लावता घराबाहेर पडत नाही. गावातून अमरावतीला दूध विक्रीला जाणारे लोक गावात परत येताच आंघोळ करतात. विशेष म्हणजे गावाबाहेरुन येणारे व्यक्ती जोपर्यंत आंघोळ करून स्वछ होत नाहीत तोर्यंत त्यांना जवळही कोणी उभे करत नाही.