महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Strawberry in amravati : अमरावती जिल्ह्यात फुलवली स्ट्रॉबेरीची बाग; असा केला प्रयोग यशस्वी

स्ट्रॉबेरीची शेती म्हटले महाबळेश्वर जिल्ह्याची आठवण येते. मात्र, अमरावतीमधील शेतकऱ्यांनी ( Strawberry in Amravati ) चक्क आपल्या शेतात स्ट्रॉबेरीची शेती फुलवली आहे. च सहा वर्षांपूर्वी एका शेतकऱ्यापासून सुरू झालेला स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग आता सात शेतकऱ्यापर्यंत जाऊन पोहचला आहे. चिखलदरा येथील थंड वातावरण हे स्ट्रॉबेरी शेतीला अनकुल असल्याने तसेच येथील स्ट्रॉबेरीला पर्यटकांकडून मोठी मागणी असल्याने भविष्यात स्ट्रॉबेरी शेतीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.

अमरावती
Strawberry in amravati

By

Published : Jan 26, 2022, 4:01 PM IST

अमरावती - मनात जिद्द, चिकाटी आणि शेतीत नवनवीन प्रयोग करण्याची इच्छाशक्ती असली की शेतीच्या कमी क्षेत्रातही लाखो रुपयांचा नफा मिळवता येतो, हे चिखलदऱ्याच्या पायथ्याशी असलेल्या मोथा आणि आलाडोह गावातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी ( Strawberry in Amravati ) करून दाखवलं आहे. कारण येथील शेतकरी आता पारंपरिक शेतीला फाटा देऊन स्ट्रॉबेरी शेतीकडे ( Strawberry Farming ) वळताना दिसत आहे. पाच सहा वर्षांपूर्वी एका शेतकऱ्यापासून सुरू झालेला स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग आता सात शेतकऱ्यापर्यंत जाऊन पोहचला आहे. चिखलदरा येथील थंड वातावरण हे स्ट्रॉबेरी शेतीला अनकुल असल्याने तसेच येथील स्ट्रॉबेरीला पर्यटकांकडून मोठी मागणी असल्याने भविष्यात स्ट्रॉबेरी शेतीचे क्षेत्र ( Strawberry Cultivation ) वाढण्याची शक्यता आहे.

अमरावतीमध्ये स्ट्रॉबेरीच्या शेतीचा प्रयोग यशस्वी
विदर्भाचा काश्मीर म्हणून चिखलदराची ओळख आहे. सातपुडा पर्वत रांगा असल्याने व पहाडी भाग असल्याने चिखलदारामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो अति पावसामुळे पारंपारिक पिके तर अनेकदा धोक्यात येतात. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अनेकदा नुकसान देखील सहन करावे लागते. त्यामुळे या शेतकऱ्यांना नवीन शेतीचा मार्ग दाखवण्यासाठी अमरावती येथील श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयातील संशोधकांनी स्ट्रॉबेरी लागवडीच्या माध्यमातून या भागातील शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती स्ट्रॉबेरी शेतीची संकल्पना समोर आणली. यासाठी तब्बल आठ वर्ष या शेतीवर संशोधन केल्यानंतर चिखलदरामध्ये स्ट्रॉबेरी शेतीला सुरुवात करण्यात आली. महाबळेश्वर प्रमाणेच चिखलदरा येथील वातावरण हे स्ट्रॉबेरीला पोषक आहे. त्यामुळे येथील स्ट्रॉबेरी रसाळ असून खायला गोड आणि तिची साईजही मोठी असल्याचं स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी नारायण खडके सांगतात.चिखलदऱ्याच्या पायथ्याशी असलेल्या आलाडोह येथील नारायण खडके यांनी केवळ दहा गुंठे शेत जमिनीत स्ट्रॉबेरीची शेती केली आहे. स्ट्रॉबेरीची शेती करण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा पहिले जमिनीचे सपाटीकरण करून पाच फूट अंतरावर समांतर गादीवाफे तयार केले. त्यावर महाबळेश्वर येथून आणलेली स्ट्रॉबेरीचे रोप हे समान अंतरावर लावली. त्यांनतर ड्रिप द्वारे पाणी दिलं आणि त्याची वेळोवेळी मशागत केली. बघता-बघता स्ट्रॉबेरीची बाग फुलली आहे. विशेष म्हणजे रासायनिक खतांचा वापर न करता घरीच असलेल्या जनावरांचे शेणखत त्यांनी या शेतीसाठी वापरले. त्यामुळे स्ट्रॉबेरीचे भरघोस उत्पादन देखील झाले आहे. त्यामुळे केवळ दहा गुंठे शेतीमध्ये एक ते दीड लाख रुपयांचा नफा मिळणार असल्याचेही नारायण खडके यांनी सांगितले.स्ट्रॉबेरी शेतीचे पर्यटकांना आकर्षण -


विदर्भामध्ये स्ट्रॉबेरीचे उत्पादन कुठेच घेतले जात नाही. कारण, त्याला वातावरण हे थंड पाहिजे स्ट्रॉबेरीला अनुकूल असलेले वातावरण हे चिखलदारामध्ये आहे. त्यातच चिखलदारा मध्ये पर्यटक येत असल्याने त्यामुळे शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी विकण्यासाठी बाजारपेठ शोधण्याची गरज नाही. पर्यटकच स्ट्रॉबेरी खरेदी करतात. त्यातच पर्यटकांना चिखलदरा येथे ताजी स्ट्रॉबेरी मिळत असल्याने पर्यटकाना येथील स्ट्रॉबेरीची भुरळ पडली आहे. तसेच पर्यटकांना या स्ट्रॉबेरी शेतीचे आकर्षण आहे. गावानजीक स्ट्रॉबेरी शेती असून पर्यटक या स्ट्रॉबेरी शेतीत फेरफटका देखील मारतात.

हेही वाचा -Sanjay Raut on Opposition : 'मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे राज्यात उत्साह, तर मुख्यमंत्र्यावर टीका करणारे नामर्द'

ABOUT THE AUTHOR

...view details