अमरावती - राज्यात एकीकडे कोरोनाने थैमान घातले असल्याने प्रचंड नुकसान हे होत आहे. बालविवाह ही समस्या गंभीर आहे. तरी कोरोनाच्या या भयंकर काळात राज्यात एकूण ५६० बाल विवाह रोखण्यात महिला व बालकल्याण विभागाला यश आल्याची माहिती राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकुर यांनी दिली. एवढे बालविवाह रोखण्याचे प्रयत्न केले असले तरी अनेक ठिकाणी बालविवाह सुद्धा रोखता आले नाही. याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी अधिकाऱ्यांनी यावर लक्ष देण्याची गरज असल्याचे देखील म्हटले आहे.
अधिकाऱ्यांनी समाज माध्यमे, कलाकृती प्रचार साहित्यावर भर द्यावा -
बालविवाह रोखण्यासाठी माहिती व्यवस्था कार्यक्रम करण्याची गरज आहे. असे मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या. त्याकरीता अधिकाऱ्यांनी ग्रामसेवक, ग्रामपंचायत यंत्रणाशी समन्वयाने काम करावे, समाज माध्यमे, कलापथके व अन्यत्र कलाकृती प्रचार साहित्य यावर भर द्यावा. अशी मागणी अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे.