अमरावती- सुमारे दोन महिन्याच्या सुट्यानंतर शहरात पुन्हा शाळा सुरू झाल्या आहेत. नव्या शैक्षणिक सत्राला विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला आहे. विद्यार्थ्यांनी आनंदाने नव्या सत्राला सुरुवात करावे यासाठी राज्यातील अनेक शाळांमध्ये मुलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर अमरावतीच्या शिवाजी बहुउद्देशिय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सुद्धा विद्यार्थ्यांचे जल्लोशात स्वागत करण्यात आले.
अमरावतीत विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी वाजत-गाजत स्वागत - बँड पथकाने वाजत गाजत विद्यार्थ्यांचे स्वागत
स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय कृषी मंत्री डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या पाहिल्या श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित शिवाजी बहुउद्देशिय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अमरावतीच्या शाळेत विद्यार्थी स्वागत सोहळ्या चे आयोजन करण्यात आले. शाळेच्या आवारात विद्यार्थी येताच शालेय प्रशासनानी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ दिले. बँड पथकाने वाजत गाजत विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय कृषी मंत्री डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या पहिल्या श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचालित शिवाजी बहुउद्देशिय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अमरावतीच्या शाळेत विद्यार्थी स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, मुख्याध्यापक विजय मुडे आदींनी शाळेतील विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. शाळेच्या आवारात विद्यार्थी येताच शालेय प्रशासनाने विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ दिले. बँड पथकाने वाजत गाजत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी शाळेच्या आवारात वृक्षारोपणही करण्यात आले होते. पहिल्याच दिवशी शाळेतील शिक्षकांच्या वतीने विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरही आनंद पाहायला मिळाला.