अमरावती-समृद्धी महामार्गामुळे मंगरूळ चव्हाळा येथील 'प्रश्नचिन्ह' आश्रमशाळा उद्धवस्त होऊन दोन विहिरी नष्ट होणार आहेत. यामुळे शाळेचे काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली.
महाराष्ट्र शासनाचा महावत्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या समृद्धी महामार्गामुळे मंगरूळ चव्हाळा येथील 'प्रश्नचिन्ह' आश्रमशाळेचा बराचसा भाग तुटला आहे. शाळेचे मैदान, दोन पाण्याच्या टाक्या आणि विहीरी तसेच मैदानाची संरक्षण भिंत याची नुकसानभरपाई मिळावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.