महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती : विद्यार्थीनींनी वृक्षारोपण करत साजरा केला 'रक्षाबंधन' - अमरावती विद्यार्थीनींनी वृक्षारोपण करत साजरा केला रक्षाबंधन

परतवाड्यातील काही विद्यार्थीनींनी चक्क झाडालाच आपला भाऊ मानून वृक्षारोपण करत झाडांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली आहे.

amravati latest news
amravati latest news

By

Published : Aug 22, 2021, 6:59 PM IST

अमरावती - रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे. संपूर्ण भारतीय संस्कृतीमध्ये बहिण आपल्या भावाला राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते. तर भाऊ आपल्या बहिणीसाठी वेळप्रसंगी धाऊन तिची रक्षा करण्याची भूमिका घेतो. मात्र, अमरावती जिल्ह्याच्या परतवाड्यातील काही विद्यार्थीनींनी चक्क झाडालाच आपला भाऊ मानून वृक्षारोपण करत झाडांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली आहे.

प्रतिक्रिया

'तर वृक्ष आपले संरक्षण करतील' -

ज्याप्रमाणे बहिण आपल्या भावाला राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते, त्याचप्रमाणे परतवाड्यातील तुळजाई स्पोर्टया ग्रुपच्यावतीने काही विद्यार्थीनींनी चक्क झाडालाच आपला भाऊ मानत त्याला राखी बांधून वृक्षारोपण केले. या वृक्षांना आता जगवण्याची जबाबदारी सुद्धा या चिमुकल्या मुलींनी घेतली आहे. तर ज्याप्रमाणे भाऊ बहिणीची रक्षा करतो, त्याचप्रमाणे आपण जर झाडाला जगवले तर झाडेसुद्धा आपल्याला जगवतील. आपले संरक्षण करतील. आपल्याला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन देतील, अशी प्रतिक्रिया या मुलींनी दिली.

हेही वाचा - अफगाणिस्तानातून सैन्य माघारीचा निर्णय मूर्खपणाचा, टोनी ब्लेअर यांची परखड टीका

ABOUT THE AUTHOR

...view details