अमरावती - अमरावती शहरात मागील काही दिवसांपासून कोरोणाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांनी शहरात संचारबंदी सुरू केली आहे. त्यामुळे, शहरातील अभ्यासिका, वाचनालयसुद्धा बंद करण्यात आले आहेत. यामुळे, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी मोठ्या अडचणीत आले आहेत. त्यामुळे, राज्यभरातील अभ्यासिका चालू असताना अमरावतीमधील अभ्यासिका बंद का केल्या, असा प्रश्न स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आज केला.
विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन अभ्यासिका सुरू करण्याची परवानगी द्या, अशी मागणी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे केली. पुढील महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा असल्याने आम्ही घरी राहून अभ्यास कसा करायचा. जिल्ह्यात मंदिरे, मद्यालय, हॉटेल सुरू झाले. पण, आमच्या अभ्यासिका का बंद केल्या, असा सवाल विद्यार्थ्यांनी विचारला आहे.
हेही वाचा -वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य, फास्टॅग नसलेल्या वाहनांना भरावा लागणार दुप्पट टोल