महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांचा छळ; प्राचार्यांविरोधात आंदोलन सुरू - SPECIAL

प्राचार्य आणि विभागप्रमुखाचा त्रास विकोपाला गेला असून त्यांच्या त्रासाला कंटाळून कोणी स्वतःच्या जीवाचे बरेवाईट करून घेऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे विद्यार्थ्यी सांगत आहेत.

नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचा प्रचार्यांविरोधात आंदोलन

By

Published : Apr 26, 2019, 2:21 PM IST

अमरावती - प्राचार्य आणि विभाग प्रमुख यांच्याकडून मानसिक त्रास होत असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणे त्याचा छळ केला जात असल्याचा आरोप डॉ. पंजाबराव देशमुख नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. या प्रकरणी विद्यार्थ्यांनी प्राचार्यांविरोधात रोष व्यक्त करत महाविद्यालयात धरणे आंदोलन सुरू केले आहे.

नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचा प्रचार्यांविरोधात आंदोलन

प्राचार्य डॉ. विवेक वेदा आणि विभागप्रमुख निलेश सुरेश हे विद्यार्थ्यांचा मानसिक छळ करत आहेत. तर कधी अपशब्द वापरतात. विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून त्यांचाही अपमान करतात. प्राचार्य आणि विभागप्रमुखाचा त्रास विकोपाला गेला असून त्यांच्या त्रासाला कंटाळून कोणी स्वतःच्या जीवाचे बरेवाईट करून घेऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे विद्यार्थ्यी सांगत आहेत.

विशेष म्हणजे या प्रकरणाची तक्रार गुरुवारी रात्री गडगेनगर पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे. आम्हाला योग्य न्याय मिळावा, अशी मागणी हेमंत तिवारी, आकाश जैसिंगपुरे, कुणाल राठोड यांनी केली आहे. या प्रकाराविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी या प्रकाराची दाखल घ्यावी, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केलो आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details