अमरावती - वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद दरम्यान अमरावती शहरात तणाव निर्माण झाला. बंद समर्थकांनी इर्विन चौक परिसरातील व्यापारी प्रतिष्ठानांवर दगडफेक केली. त्यामुळे धुमाकूळ घालणाऱ्या काही समर्थकांना पोलिसांनी चोप देऊन ताब्यात घेतले.
अमरावतीत बंद दरम्यान दगडफेक; पोलिसांनी दिला चोप - व्यापारी प्रतिष्ठाण
अमरावतीत बंद समर्थकांनी इर्विन चौक परिसरातील व्यापारी प्रतिष्ठानांवर दगडफेक केली. त्यामुळे धुमाकूळ घालणाऱ्या काही समर्थकांना पोलिसांनी चोप देऊन ताब्यात घेतले.
शहरात इर्विन चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते एकत्रित आले. कार्यकर्त्यांनी नवीन चौकात ठिय्या देऊन रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. इर्विन चौक येथून बंद समर्थक जयस्तंभ चौकाच्या दिशेने निघाले. पोलिसांनी मोर्चा काढण्यास नकार दिला होता. मात्र दरम्यान, रस्त्यावरील उघड्या असणाऱ्या व्यापारी प्रतिष्ठानांवर समर्थकांनी अचानक दगडफेक केली. त्यामुळे त्याठिकाणी गोंधळ उडाला. पोलिसांनी काही आंदोलकांना चोप देऊन ताब्यात घेतले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे डाॅ. आलिम पटेल, अॅड. सिद्धार्थ गायकवाड यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि दगडफेक करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकारामुळे इर्विन चौक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.