अमरावती - महानगरपालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी शहरातील विविध भागात पाहणी केली. प्रशासनाने जारी केलेल्या आदेशानुसार, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ दरम्यान उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. शहरातील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी आज (23 मे) महानगरपालिका आयुक्तांनी प्रत्यक्ष चित्रा चौक येथे पाहणी केली. यावेळी पोलीस उपआयुक्त शंशीकांत सातव यांच्याशी चर्चा केली. या परिसरात गर्दीचे प्रमाण जास्त असल्यामुळे दुकानदारांनी व ग्राहाकांनी दिलेल्या सुचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, यासाठी कार्यवाही करण्याचे सक्त निर्देश यावेळी आयुक्तांनी अतिक्रमन विभाग, बाजार व परवाना विभागाला दिले.
दुकानदारांना सूचना
मास्क न लावणाऱ्या, विनाकारन फिरणाऱ्या नागरिकांची चित्रा चौक येथे अँटीजेन टेस्ट करणे सुरु होते. या ठिकाणी आयुक्तांनी डॉ. संदिप पाटबागे यांच्याशी चर्चा करून सद्याच्या कार्यवाहीची माहिती घेतली. यावेळी त्यांनी टेस्टींग वाढविण्याच्या सूचना दिल्या. इतवारा परिसराची पाहणी करताना जे दुकाने ११ वाजल्यानंतरही उघडी होती. त्यांना बंद करण्याच्या सुचना देण्यात आल्या. दुकानदारांनाही त्यांनी यावेळी सूचना दिल्या. 'दुकानदारांनी दिलेल्या वेळेतच आपले दुकान उघडावे. शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे', असे आयुक्त प्रशांत रोडे यांनी म्हटले.
टेस्ट वाढवण्याच्या सूचना