अमरावती -जिल्ह्यातील कोरोना संक्रमनाची साखळी तोडण्यासाठी तसेच कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शनिवारी सायंकाळपासून ते सोमवारच्या सकाळपर्यंतच्या कडक संचारबंदीची लागू करण्यात आली. याकरिता शहरात ठीक-ठिकाणी तबल दोन हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. लॉकडाऊन व पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेण्यासाठी अमरावती शहराच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी रस्त्यांवर पाहणी केली. दरम्यान आज अमरावती जिल्ह्यात वर्षभरातील सर्वाधीक तबल 727 नवे रुग्ण आढल्याने व 7 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांना मास्क आणि सॅनिटाईझरचे वाटप -
आजपासून सुरू झालेल्या या 36 तासाच्या लॉकडाऊन दरम्यान विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर पोलिसांकडून कारवाई होणार आहे. जे व्यावसायिक लॉकडाऊनचे पालन करणार नाही, त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली जाणार आहे. जे पोलीस कर्मचारी सध्या तैनात आहे, त्यांना पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी मास्क आणि सॅनिटाईझरचे वाटप सुद्धा केले. दरम्यान अमरावतीकरांनी लॉकडाऊनला चांगले सहकार्य केले असून पुढेही असेच सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त यांनी केले आहे.
तोपर्यंत संचारबंदीचे पालन करावे -