अमरावती:वडाळी परिसरात रात्री दहा वाजताच्या सुमारास निघालेली वरात राम मंदिरा जवळ येताच वराततिल काही वऱ्हाडीनी जय श्रीराम चे नारे दिले तसेच यावेळी डीजे वर सुद्धा जय श्रीराम च्या घोषणा देणारे गाणे वाजविण्यात आले. राम मंदिरात नंतर जवळच असणाऱ्या चौकात असणाऱ्या मशीद परिसरात ही वरात पोहोचली असताना वरातीतील काही मंडळींचा रस्त्यात उभ्या असणाऱ्या लोकांशी वाद झाला आणि वरातीत काही युवकांनी चक्क मशिदी लगतच्या एका घरावर दगडफेक केली. या घटनेमुळे वडाळी परिसरात तणाव निर्माण झाला होता.
Tensions in Wadali : लग्नाच्या वरातीत दगडफेक: वडाळी परिसरात तणाव - काही लोकांचा वाद
अमरावती शहरातील वडाळी परिसरात लग्नाच्या वरातीत (Stone throwing at wedding party) सहभागी काही जणांचा रस्त्याच्या उभ्या असणाऱ्या काही लोकांचा वाद झाला (Some people argue) आणि वरातीत सहभागी लोकांनी चक्क दगडफेक केल्यामुळे परिसरात तणाव (Tensions in Wadali area) निर्माण झाला.
वडाळी परिसरात तणाव
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलिसांचा ताफा वडाळी परिसरात दाखल झाला. पोलीस उपायुक्त एम.एम. मकानदार हेसुद्धा पडाळी परिसरात दाखल झाले. ज्यांच्या घरी उद्या लग्न आहे त्यांच्या घरातील मंडळींची पोलिसांनी चौकशी केली असून दगडफेक करणार्यांची धरपकड पोलिसांनी सुरू केली आहे. पोलीस उपायुक्त एम ए मकानदार यांच्यासह फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रात्री दीड वाजता सुद्धा वडाळी परिसरात ठाण मांडून होते.