महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Stone pelting in Achalpur : अमरावती जिल्ह्यातील अचलपुरात 2 गटात वाद; दगडफेकीत पोलीस जखमी - दुल्हा गेट भगवा झेंडा

जिल्ह्यातील अचलपूर ( Stone pelting in Achalpur ) शहरात दुल्हा गेटवर भगवा झेंडा फडकविल्याने प्रचंड तणाव ( Achalpur violence ) निर्माण झाला आहे. काल रात्री दहा वाजेच्या सुमारास दुल्हा गेटवर भगवा झेंडा ( Saffron flag Dulha Gate ) फडकविल्याचे लक्षात आल्यावर शहरातील दोन समुदाय आमनेसामने उभे ठाकले. यावेळी प्रचंड दगडफेक झाली.

stone pelting in achalpur
अचलपूर दगडफेट

By

Published : Apr 18, 2022, 9:06 AM IST

Updated : Apr 18, 2022, 12:48 PM IST

अमरावीत -जिल्ह्यातील अचलपूर ( Stone pelting in Achalpur ) शहरात दुल्हा गेटवर भगवा झेंडा फडकविल्याने प्रचंड तणाव ( Achalpur violence ) निर्माण झाला आहे. काल रात्री दहा वाजेच्या सुमारास दुल्हा गेटवर भगवा झेंडा ( Saffron flag Dulha Gate ) फडकविल्याचे लक्षात आल्यावर शहरातील दोन समुदाय आमनेसामने उभे ठाकले. यावेळी प्रचंड दगडफेक झाली.

गस्त घालताना पोलीस

हेही वाचा -Hanuman Chalisa : राणा यांच्या घरावर जाणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी अडवले

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस ताफा घटनास्थळी पोहचला असता जमावाने पोलिसांच्या दिशेनेही दगडफेक केली. या दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी जखमी असल्याची माहिती आहे. दरम्यान परिस्थिती चिघळू नये म्हणून संपूर्ण अचलपूर शहरात, तसेच परतवाडा येथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.

दोन्ही बाजूंनी दगडफेक -अचलपूर शहरात दोन्ही गटांकडून दगडफेक झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे अचलपुरात काल रात्री 11.30 वाजता कलम 144 अंतर्गत संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध भागांतून पोलीस कुमक अचलपुरात बोलाविण्यात आली आहे.

हेही वाचा -Navneet Rana Hanuman Chalisa : खासदार नवनीत राणांचे दोन हजार महिलांसोबत हनुमान चालीसा पठन

Last Updated : Apr 18, 2022, 12:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details