अमरावती - शहरात पुलवामा अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्चात काही युवकांनी बाजारपेठ बंद करण्यासाठी चक्क दगडफेक केल्याचा प्रकार घडला आहे. या दगडफेकीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
अमरावतीत बाजारपेठ बंद करण्यासाठी युवकांकडून दगडफेक - पुलवामा
पुलवामा हल्ल्याच्या निषेधात शहरातील काही व्यापारी संकुले आणि नंदगापेठ बंद होते. दरम्यान, दुपारी युवकांचे एक टोळक्याने राजकमल, जयस्तंभ या परिसरातील व्यापाऱ्यांना आपली दुकाने बंद करा म्हणून चक्क धमकवले.
अमरावती बाजारपेठ
पुलवामा हल्ल्याच्या निषेधात शहरातील काही व्यापारी संकुले आणि नंदगापेठ बंद होते. दरम्यान, दुपारी युवकांचे एक टोळक्याने राजकमल, जयस्तंभ या परिसरातील व्यापाऱ्यांना आपली दुकाने बंद करा म्हणून चक्क धमकवले. युवकांच्या या प्रकाराला व्यापाऱ्यांनी नकार देताच युवकांनी दुकानांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच शहर कोतवाली पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या युवकांना चांगलाच चोप दिला. त्यानंतर युवकांचे टोळके सैरावैरा पळाले.