अमरावती - आमच्या शाळेत शिक्षणापेक्षा पैशाला जास्त महत्त्व आहे, असे बोलत असलेल्या शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे संभाषण पालकांनी व्हायलर केले आहे. नांदगाव खंडेश्वर शहरातील सीबीएससी बोर्डाच्या स्कूल ऑफ स्मार्ट किड्स या शाळेतील पदाधिकाऱ्यांनी पालकांकडे शैक्षणिक शुल्क मागितले. काही गरीब पालकांकडे पैसै नसल्याने त्यांनी शुल्क भरण्यास विलंब लावला. यामुळे संस्थेने त्यांच्याकडे पैशांसाठी तगादा लावत विद्यार्थ्याला शिक्षण देण्यास मज्जाव केला.
"शिक्षणाला महत्त्व नाही, पैशाला आहे"... अमरावतीत 'स्टिंग ऑपरेशन' व्हायरल!
नांदगाव खंडेश्वर शहरातील सीबीएससी बोर्डाच्या स्कूल ऑफ स्मार्ट किड्स या शाळेतील पदाधिकाऱ्यांनी पालकांकडे शैक्षणिक शुल्क मागितले. काही गरीब पालकांकडे पैसै नसल्याने त्यांनी शुल्क भरण्यास विलंब लावला. यामुळे संस्थेने त्यांच्याकडे पैशांसाठी तगादा लावत विद्यार्थ्याला शिक्षण देण्यास मज्जाव केला.
शाळेचे सचिव राम महाजन यांनी पालकांना 30% शुल्क जमा करून ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात येईल, असे सांगितले. फी भरल्यानंतर ऑनलाइन शिक्षणाला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांना ऑनलाइन ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात आले. यानंतर काही दिवसात ऑनलाइन ग्रुपमधून त्यांना कमी केले. शिक्षणापासून वंचित ठेवल्याने यासंबंधी पंचायत समिती गटशिक्षण अधिकार्यांना तक्रार देण्यात आली. या निवेदनावर पवन जोशी, मनोज जांगडा, सतीश कारमोरे यांच्या सह्या आहेत. मात्र अद्याप यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीय.
त्यामुळे संचालक राम महाजन, शाळेचे अध्यक्ष सुनील शिरभाते व मुख्याध्यापक अय्युब शहा यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्याने संबंधित संचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.