अमरावती - कोरोनाच्या संकटात शाळेची घंटा कधी वाजणार याची माहिती नाही. मात्र, मोफत शालेय पाठ्यपुस्तक योजनेतील पाठ्यपुस्तके तालुक्यात पोहोचली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून गटसाधन केंद्रातील व्यक्तींनी पाठ्यपुस्तकांवर निर्जंतुकीकरणाची फवारणी करून पुस्तके शाळेत पाठविण्याचे नियोजन केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोफत शालेय पाठ्यपुस्तकांचे निर्जंतुकीरण - शालेय पाठ्यपुस्तकांवर निर्जंतुक फवारणी
दरवर्षी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. या वर्षी शाळेचा पहिला दिवस कधी उजाडणार हाच प्रश्न पालकांसोबत शिक्षकांनाही पडला आहे. शासनाकडून शाळा उघडण्याचे निर्देश येतील. तेव्हा तालुक्यातील गटसाधन केंद्र शालेय सत्रासाठी सज्ज असल्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी सांगितले.
![कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोफत शालेय पाठ्यपुस्तकांचे निर्जंतुकीरण शालेय पाठ्यपुस्तके](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11:35-mh-am-01-amravati-10016-05062020111839-0506f-1591336119-548.jpg)
कोरोनामुळे यावर्षी शिक्षणाचे भवितव्य अधांतरी आहे. लॉकडाऊन टप्याटप्प्याने उघडत असला तरी शाळा मात्र कधी उघडणार? उघडली तरी विद्यार्थी येणार का? असे अनेक प्रश्न शिक्षण विभागाच्या पुढ्यात आहेत. असे असले तरी, जिल्हा परिषद शिक्षण विभाग आपल्या परीने पूर्वतयारीला लागला आहे.