अमरावती- महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळविस्तार शिवसेनेच्या कोठ्यातून प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांना राज्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली. त्यानंतर मंत्र्यांना शासकीय निवासस्थाने वितरीत करण्यात आली आहेत. या निवासस्थान वाटपावरून बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
'निवासस्थान हेमामालिनीच्या घराजवळ आहे की स्मशानभूमीत याच्याशी संबध नाही' - महाविकास आघाडी
काही अधिकाऱ्यांनी निवासस्थान देण्यामध्ये नक्कीच बदमाशी केली आहे. मुद्दाम आम्हाला विधान परिषदेत दालन दिले गेले. तिथे कार्यालयाची जागा दिली. मंत्रालयातही दालन दिले नाही. आमच्याकडे मोठ्या प्रमाणात अपंग बांधव येत असतात त्यासाठी पहिल्या माळ्यावर देणं गरजेचं होतं, पण दिले नसल्याचे सांगत त्यांनी खंत व्यक्त केली.
मला स्मशानभूमी जवळचे निवासस्थान मिळाले आहे. ज्या ठिकाणी कोणी जात नाही. असे ठिकाण आम्हाला दिले आहे. मात्र, प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत आम्ही इथपर्यंत आलो आहोत. पुढेही काम करतच राहणार आहे. तसेच माझं निवासस्थान हे स्मशान भूमीजवळ दिले असले तरी काही अडचण नाही, काम करायची आमच्यात धमक आहे. त्यामुळे निवास्थान स्मशान भूमीजवळ आहे, समुद्राजवळ आहे, की हेमामालिनीच्या घराजवळ आहे, याच्याशी आमचा संबंध नसून काम करणे हाच आमचा विषय असल्याचेही राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले.
काही अधिकाऱ्यांनी निवासस्थान देण्यामध्ये नक्कीच बदमाशी केली आहे. मुद्दाम आम्हाला विधान परिषदेत दालन दिले गेले. तिथे कार्यालयाची जागा दिली. मंत्रालयातही दालन दिले नाही.आमच्याकडे मोठ्या प्रमाणात अपंग बांधव येत असतात त्यासाठी पहिल्या माळ्यावर देणं गरजेचं होत, पण दिले नसल्याचे सांगत त्यांनी खंत व्यक्त केली.