महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीमध्ये तीन दिवसांचा राज्यस्तरीय इज्तेमा; ४७ वर्षांनंतर आयोजनाचा बहुमान - अमरावती राज्यस्तरीय इज्तेमा न्यूज

अमरावती जिल्ह्याला ४७ वर्षांनंतर इज्तेमा आयोजनाचा बहुमान मिळाला आहे. त्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या धार्मिक मेळाव्यासाठी देश-विदेशातून १५ लाखांपेक्षा जास्त मुस्लीम भाविक येणार आहेत.

तीन दिवसांचा राज्यस्तरीय इज्तेमा
तीन दिवसांचा राज्यस्तरीय इज्तेमा

By

Published : Dec 5, 2019, 1:35 PM IST

Updated : Dec 5, 2019, 4:20 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव पेठ एमआयडीसी परिसरात शनिवारपासून तीन दिवसीय राज्यस्तरीय आलिमी इज्तेमा सुरू होणार आहे. अमरावती जिल्ह्याला ४७ वर्षांनंतर इज्तेमा आयोजनाचा बहुमान मिळाला आहे. त्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या धार्मिक मेळाव्यासाठी देश-विदेशातून १५ लाखांपेक्षा जास्त मुस्लीम भाविक येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

तीन दिवसांचा राज्यस्तरीय इज्तेमा


इज्तेमासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना मुबलक सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी हजारो मुस्लीम बांधव मागील एक महिन्यापासून महाश्रमदान करत आहेत. इज्तेमामध्ये आमिर सादसाहब यांच्यासह २० लोकांच्या विशेष उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

या इज्तेमात अल्लाहची भक्ती आणि अल्लाहचे शेवटचे प्रेषित (दूत) मुहम्मद पै.(सल्ल) यांची शिकवण याविषयी प्रमुख उलेमा मार्गदर्शन करणार आहेत. आठ तारखेला सायंकाळी 400 मुस्लिम जोडप्यांचा सामुहिक विवाह येथे पार पडणार आहेत.

इज्तेमासाठी तात्पुरत्या स्वरुपात स्वच्छतागृह उभारणे, लाईट, ध्वनियंत्रण इत्यादी कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. संयोजकांनी राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या मुस्लीम बांधवांवर स्वतंत्रपणे प्रत्येक कामाची जबाबदारी सोपवली आहे. या कार्यक्रमासाठी सुमारे १ हजार २०० एकरमध्ये ४८ लाख चौरस फुटांचा भव्य सभामंडप उभारण्यात आला आहे. याशिवाय छोटे-छोटे शामियानेही उभारण्यात आले आहेत. मुख्य सभामंडपात एकाच वेळी सुमारे 15 ते 20 लाख मुस्लीम बांधव बसू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

Last Updated : Dec 5, 2019, 4:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details