अमरावती - तहान, भूक सारे काही विसरून विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना पावसातही आपला उत्साह कायम ठेवता यावा, यासाठी शासनाकडून त्यांना आज रेनकोट वितरित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्मलवारी योजनेंतर्गत भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि नगरसेवक तुषार भारतीय यांच्या हस्ते वारकऱ्यांना रेनकोट देण्यात आले.
आता पावसातही थांबणार नाहीत वारकऱ्यांची पावले; शासनाकडून रेनकोटचे वाटप - government
योजनेंतर्गत आज चांदूर बाजार तालुक्यातील संत श्री गुलाबराव महाराज सेवा संस्था बोराळा येथील पालखी आज अमरावतील पोहचली. बडनेरा येथे मुक्कामी असणाऱ्या या पालखीतील वारकऱ्यांना तुषार भारतीय यांच्या हस्ते रेनकोट वितरित करण्यात आले.

ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना त्यांच्या मार्गात कुठलाही त्रास होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावतीने निर्मलवारी योजनेच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. योजनेंतर्गत आज चांदूर बाजार तालुक्यातील संत श्री गुलाबराव महाराज सेवा संस्था बोराळा येथील पालखी आज अमरावतील पोहचली. बडनेरा येथे मुक्कामी असणाऱ्या या पालखीतील वारकऱ्यांना तुषार भारतीय यांच्या हस्ते रेनकोट वितरित करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख, भाजपच्या बडनेरा शहर महिला प्रमुख पूजा जोशी, मंदार नॅनोटी आदी उपस्थित होते.