अमरावती- देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यातच केंद्र सरकारकडून महिलांच्या जनधन खात्यात प्रत्येकी ५०० रुपये टाकण्यात आले आहेत. मात्र, भर उन्हात पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. त्यांना गैरसोय होऊ नये, तसेच सोशल डिस्टंन्सिंगचे तीनतेरा होऊ नये म्हणून जिल्ह्यातील स्टेट बँकेच्या विविध शाखांनी कार्यालय परिसरात मंडप उभारले आहेत.
स्टेट बँकेतून पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी, बँकेने केली मंडप, पाण्याची व्यवस्था - jan dhan money tiwsa bank
जिल्ह्यातील अनेक बँकांनी ग्राहकांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी कुठलीच उपाय योजना केली नाही. त्यामुळे, बँकांसमोर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मात्र, स्टेट बँकेच्या अनेक शाखांसमोर उन्हापासून बचाव करण्यासाठी मंडप, नेट बांधून पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील अनेक बँकांनी ग्राहकांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी कुठलीच उपाय योजना केली नाही. त्यामुळे, बँकांसमोर सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मात्र, स्टेट बँकेच्या अनेक शाखांसमोर उन्हा पासून बचाव करण्यासाठी मंडप, नेट बांधून पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील तिवसा शहरातील शाखेसमोर मंडप उभारल्याने महिलांकडून सोशल डिस्टंन्सिंगचे पालन होत असल्याचे दिसून आले आहे.
हेही वाचा-अमरावतीच्या चांदुर बाजारमध्ये पोलिसांच्या रूट मार्चवर नागरिकांचा पुष्प वर्षाव