अमरावती -आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी निधीतून अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी विधानसभेत केली. तसेच राज्यातील गोर गरीब रुग्णांच्या दुर्धर आजारावर उपचार करता यावे, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष उभारण्यात यावा, असेही ते म्हणाले.
प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री सहायता कक्ष सुरू करा -
आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी या निधीतून अर्थसहाय्य पुरवले जाते. मागील सरकारने यासाठी उपराजधानीतील मुख्यमंत्री सचिवालयात विशेष कक्ष सुरू केले होते. त्यानंतर हे कक्ष बंद करण्यात आले. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आमदार देवेंद्र भुयार यांनी कक्ष सुरू करून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यावी, या योजनेसाठी विदर्भातीलच नव्हेतर राज्यातील इतर कुठल्याही भागातील लोकांना मुंबई मंत्रालयात मदतीसाठी यावे लागू नये, यासाठी त्यांच्या जिल्ह्याच्या मुख्यालयातच या निधीसाठी प्रस्ताव सादर करता यावा म्हणून प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री सहायता कक्ष सुरू करण्याची मागणीही यावेळी त्यांनी केली.
हेही वाचा - शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली अभियंत्याला चोवीस लाखांचा गंडा, गुन्हा दाखल