महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ऐन दिवाळीच्या दिवसांत एसटी कर्मचाऱ्यांचा संप, प्रवाशांची गैरसोय - प्रवाशांची गैरसोय

ऐन दिवाळीच्या दिवसात एसटी बस बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. गुरुवारी (दि. 28) सकाळपासूनच अमरावती मध्यवर्ती बस स्थानक बंद झाल्याने या बसस्थानकातून कुठलीही बस बाहेर गेली नाही तर बाहेरून येणाऱ्या गाड्यांना बस स्थानका बाहेरूनच परतावे लागले. एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्या शासनाने पूर्ण कराव्यात या मागणीसाठी संप पुकारण्यात आल्याने एसटी बसची चाके ही थांबली आहेत.

छायाचित्र
छायाचित्र

By

Published : Oct 28, 2021, 4:30 PM IST

अमरावती -ऐन दिवाळीच्या दिवसात एसटी बस बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. गुरुवारी (दि. 28) सकाळपासूनच अमरावती मध्यवर्ती बस स्थानक बंद झाल्याने या बसस्थानकातून कुठलीही बस बाहेर गेली नाही तर बाहेरून येणाऱ्या गाड्यांना बस स्थानका बाहेरूनच परतावे लागले. एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्या शासनाने पूर्ण कराव्यात या मागणीसाठी संप पुकारण्यात आल्याने एसटी बसची चाके ही थांबली आहेत.

ऐन दिवाळीच्या दिवसांत एसटी कर्मचाऱ्यांचा संप

महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण करा

राज्य परिवहन महामंडळाचे राज्य राज्य शासनाच्या सेवेत विलगीकरण करून घ्यावे. यामुळे राज्य शासनाच्या इतर विभागातील कर्मचाऱ्यांना प्रमाणे राज्य राखीव परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांनाही आपल्या कामाचा योग्य असा मोबदला मिळेल, अशी महत्वपूर्ण मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. तसेच कामगार करारानुसार कर्मचाऱ्यांना सर्व फायदे त्वरीत मिळावेत. शासकीय कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर, 2019 पासून 28 टक्के महागाई भत्ता दिला जात असून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना केवळ 12 टक्के महागाई भत्ता दिला जात आहे. याबाबतही राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे. 30 जून, 2018 च्या पत्रानुसार राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतन वाढीचे दर, घरभाडे भत्ता यात वाढ करूनही तो दिला गेला नाही. तसेच त्याची थकबाकी ही दिली गेली नाही. शासकीय कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम 12 हजार 500 रुपये दिला जातो. मात्र, दोन वर्षांपासून मागणी करूनही आर्थिक अडचणीचे कारण सांगून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रिम ही दिला जात नाही. हा प्रकार आमच्यावर अन्याय करणारा असून आर्थिक अडचणीत सापडलेल्या 26 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचे दुःख व्यकर करत अमरावती विभागीय नियंत्रक कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना व्यक्त केला आहे.

जिल्ह्यातील सर्वच बस स्थानक बंद

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी सुरू असणाऱ्या आंदोलन दरम्यान आज जिल्ह्यातील सर्व बस स्थानक बंद आहेत. आज सकाळी बाहेरील जिल्ह्यातून काही गाड्या अमरावतीत आले असता त्या गाड्यांना बस स्थानकाबाहेर थांबवून त्यांना परत पाठविण्यात आले. दुपारपर्यंत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील सर्व बस्थानक बंद होतील, अशी माहितीही आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिली.

हेही वाचा -बडनेरातून मुंबई-पुण्याकडे जाणाऱ्या तबल 20 रेल्वेगाड्या ऐन दिवाळीच्या तोंडावर रद्द

ABOUT THE AUTHOR

...view details