अमरावती -एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलनीकरणं करण्यात यावे या मागणीसाठी राज्यभरातील हजारो एसटी कर्मचारी हे आंदोलन (ST Workers Strike) करीत आहे. अशातच दोन दिवसापूर्वी पुण्यातील आगरातून एक बस पोलीस बंदोबस्तात बाहेर काढण्यात आली होती. त्यानंतर आता अमरावतीत देखील मंगळवारी सायंकाळी एक बस बाहेर काढण्यात आली. ही बस अमरावती ते मोर्शीपर्यत पाठवण्यात आली होती. दरम्यान कर्मचाऱ्याचा संप मोडीत काढण्यासाठी धमक्या देउन कर्मचाऱ्यांना कामावर बोलावत असल्याचा आरोप आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे.
ST Workers Strike : पोलीस बंदोबस्तामध्ये लालपरी पडली आगाराबाहेर; संप मिटवण्याचा प्रयत्न - अमरावती एसटी संप
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी 26 ऑक्टोबरपासून ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं. अशातच दोन दिवसापूर्वी पुण्यातील आगरातून एक बस पोलीस बंदोबस्तात बाहेर काढण्यात आली होती. त्यानंतर आता अमरावतीत देखील मंगळवारी सायंकाळी एक बस बाहेर काढण्यात आली.
कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन -
ऐन दिवाळीत सुरू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. भाजपसह इतर राजकीय संघटनांनी संपाला पाठिंबा दिल्याने धार तीव्र झाली आहे. एसटी महामंडळाने (ST) न्यायालयात संपाविरोधात याचिका दाखल केल्याने न्यायालयाने सुद्धा संप बेकायदा ठरवला आहे. राज्य सरकार आणि एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन केले. मात्र कर्मचारी संपावर ठाम असल्याने महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे. कर्मचाऱ्यांवर कारवाई करू नये, अशी कृती समितीची मागणी आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार, एसटी महामंडळ, परिवहन मंत्री, कृती समिती आणि संपकरी शिष्टमंडळ यांच्यात सातत्याने बैठक होत आहेत. मात्र ठोस निर्णय होत नसल्यामुळे आत्तापर्यंतच्या बैठका निष्फळ ठरल्या आहेत.