अमरावती-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या 10 वीच्या परीक्षेला आजपासून (मंगळवार) सुरुवात होत आहे. यंदा 3 मार्च ते 23 मार्च या कालावधीत परीक्षा होणार आहेत.
दहावीच्या परीक्षा आजपासून; अमरावती विभागात एकूण आठ उपद्रवी केंद्र - अमरावती परीक्षा बातमी
अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात एकूण 713 केंद्रांवर परीक्षा होत आहे. विभागात 1 लाख 88 हजार 64 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. आज परीक्षेचा पहिला दिवस होता. त्यामुळे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर अतिशय उत्साहात आलेले दिसत होते.
अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात एकूण 713 केंद्रांवर परीक्षा होत आहे. विभागात 1 लाख 88 हजार 64 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. आज परीक्षेच्या पहिला दिवस होता. त्यामुळे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर अतिशय उत्साहात आलेले दिसत होते.
अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यात 119, अमरावती जिल्ह्यात 196, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येकी 156 तसेच वाशिम जिल्ह्यात 83 केंद्रांवर ही परीक्षा घेतली जात आहे. या परीक्षेसाठी एकूण 73 परीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
परीक्षेदरम्यान गैरमार्ग रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेत दक्षता पथकाची स्थापना जिल्हानिहाय करण्यात आली आहे.
अमरावती विभागात एकूण आठ उपद्रवी केंद्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील निमकवळा येथील स्वर्गीय एच गवांकर विद्यालय, भोसरी येथील महात्मा फुले विद्यालय आणि बाळापूर तालुक्यातील श्री समर्थ विद्यालय यांचा समावेश आहे. अमरावती शहरातील पॅरेडाइज, कॉलनी येथील सैफी ज्युबिली उर्दू हायस्कूल तसेच धामणगाव रेल्वे तालुक्यात जळगाव येथील अशोक विद्यालय आणि अचलपूर तालुक्यात पळसपूर येथील जनता हायस्कूलचा समावेश आहे. बुलढाणा जिल्ह्यात मोताळा तालुक्यातील कोठारी येथील जनता हायस्कूल आणि वाशिम जिल्ह्यातील काटा येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयाचा समावेश आहे. या आठही उपद्रवी परीक्षा केंद्रावर पोलिसांचा विशेष बंदोबस्त लावण्यात आला असून परीक्षेदरम्यान कुठेही गैरमार्गाचा उपयोग होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे.