महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Theater Book For Pathan : SRK चाहत्याचा नादच खुळा; पठाण चित्रपट पाहण्यासाठी चक्क अख्ये थिएटर बुक - Entire Theater Book For Pathan Movie

दीर्घ कालावधीनंतर शाहरूख खानचा पठाण सिनेमा रिलीज होत आहे. या सिनेमाचा पहिला शो पाहण्यासाठी अमरावतीमधील एकाने चक्क अख्ये थिएटर बुक केले आहे. एसआरके फॅनक्लबने थिएटरचं बुक केलं आहे.

Entire Theater Book For Pathan Movie
ठाण चित्रपट पाहण्यासाठी चक्क अख्ये थिएटर बुक

By

Published : Jan 25, 2023, 7:07 PM IST

पठाण चित्रपट पाहण्यासाठी चक्क अख्ये थिएटर बुक

अमरावती : भगव्या बिकिनीमुळे चर्चेत आलेला शाहरुख खानचा पठाण चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच हाउसफुल होताना दिसत आहे. शाहरुखच्या अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वेतीन चाहत्यांनी चक्क अख्ख थिएटर बुक केले आहे. एसआरके फॅन क्लब, अमरावतीचे फाऊंडर आशिष उके यांनी याबद्दल माहिती दिली. पठाण’चा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

चाहत्यांचा नादच खुळा : अशामध्येच आता शाहरुखच्या या जबरा फॅनने पठाण पाहण्यासाठी संपूर्ण थिएटरचं बुक केलं आहे. अमरावतीमधील एसआरके फॅनक्लबने थिएटरचे बुक केले आहे. या फॅन क्बलचा फाऊंडर चांदूर रेल्वे शहरातील आशिष उके हा आहे. अमरावतीमधील तापडिया सिटी सेंटरमधील मिराज मल्टिप्लेक्स सिनेमा याठिकाणी आज सकाळी ९ ते १२ वाजताचा शो बुक केला होता. यामध्ये उके यांनी 270 तिकीट विकत घेतले होते.

पठाणचा वाद :भगव्या बिकिनीमुळे चर्चेत आलेला शाहरुख खानचा पठाण चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच हाउसफुल होताना दिसतोय. तसेच शाहरुखच्या एका सांगलीतील फॅनने चक्क अख्ख थिएटर बुक केले आहे. चाहत्यानं त्याचे फोटो ट्विटरवर पोस्ट करत शाहरुख खानला टॅग केले होते. शाहरुखने रिप्लाय देत त्याचे आभार मानले आहेत. प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान, अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचा पठाण चित्रपट २५ जानेवारी रोजी संपूर्ण भारतात प्रदेशात होत आहे. हा चित्रपट प्रदर्शना आधीच वादात सापडला होता. भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे या चित्रपटाला उजव्या विचारांच्या लोकांनी विरोध केला होता.

अख्ये चित्रपटगृह बुक : अगदी रस्त्यावर उतरण्यापासून ते सोशल मीडियावर पठाणच्या विरोधात, समर्थनार्थ जोरदार मत मतांतर पाहायला मिळाली. आता हा चित्रपट शुक्रवारी म्हणजे २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. सांगलीतल्या विजयनगर इथल्या अरोमा चित्रपट गृहात देखील पठाण प्रदर्शित होणार आहे. चांदुर रेल्वेच्या शाहरुख खानच्या एका फॅनने हा चित्रपट पाहण्यासाठी थेट संपूर्ण थिएटरच बुक केले आहे. आशिष उके,असे या शाहरुख खानच्या फॅनच नाव आहे. त्यांने तसेच त्याच्या मित्रांनी मिळून थेट चित्रपटगृह बुक केले आहे.

हेही वाचा -Pathaan Show Increase : बॉक्स ऑफिसवर पठाणचे वादळ, आता 8 हजार स्क्रीन्सवर शाहरुखचा जलवा

ABOUT THE AUTHOR

...view details