महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती रेल्वे स्थानकावरून मजुरांना घेऊन विशेष रेल्वेगाडी लखनऊला रवाना - मजुरांसाठी विशेष रेल्वे

शनिवारी अमरावती रेल्वे स्थानकावरून लखनऊसाठी 24 डब्यांची विशेष रेल्वे गाडी सोडण्यात आली. रेल्वे गाडीने जाणाऱ्या सर्व प्रवाशांना दुपारी 4 वाजता गाडीमध्ये बसण्यासाठी रांगेत उभे करून प्रवेश देण्यात आला. प्रत्येक प्रवाशाचे यावेळी थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले. प्रवाशांना नानक रोटी ट्रस्टच्यावतीने जेवणाचा डबा, पिण्याच्या पाण्याची बाटली आणि मास्क देण्यात आले.

Special train
विशेष रेल्वेगाडी

By

Published : May 10, 2020, 8:36 AM IST

अमरावती -विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये अडकून असणाऱ्या उत्तर प्रदेशातील मजुरांना घरी पोहचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शनिवारी अमरावती रेल्वे स्थानकावरून लखनऊसाठी 24 डब्यांची विशेष रेल्वे गाडी सोडण्यात आली. एकूण 1 हजार 239 मजुरांसाठी या गाडीत व्यवस्था असताना त्यापेक्षा अधिक उत्तर भारतीय या गाडीने आपल्या गावी रवाना झाले.

सायंकाळी 6.30 वाजता राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आणि अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, खासदार नवनीत राणा यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवला. विभागीय आयुक्त पियुष सिंग आणि जिल्हाधिकारी शैलेश नवाल यावेळी उपस्थित होते.

अमरावती येथून लखनऊसाठी एक विशेष रेल्वेगाडी रवाना झाली

ज्या मजुरांची गावी जाण्यासाठी नोंदणी झाली होती व ज्यांनी 650 रुपयांचे तिकीट घेतले होते केवळ अशाच मजुरांना शनिवारी सुटणाऱ्या गाडीबाबत माहिती दिली गेली. पाचही जिल्ह्यातून राज्य परिवहन महामंडळाच्या बसद्वारे त्यांना अमरावती रेल्वे स्थानकावर आणण्यात आले. गोंधळ होऊ नये यासाठी सुटणाऱ्या विशेष रेल्वे गाडीबाबत जाहीर माहिती दिली नसल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी स्पष्ट केले.

शनिवारी सकाळपासून अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातून उत्तर भारतीय मजुरांना अमरावती रेल्वे स्थानकावर राज्य परिवहन महामंडळाच्या बसने आणण्यात आले. रेल्वे गाडीने जाणाऱ्या सर्व प्रवाशांना दुपारी 4 वाजता गाडीमध्ये बसण्यासाठी रांगेत उभे करून प्रवेश देण्यात आला. प्रत्येक प्रवाशाचे यावेळी थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले. प्रवाशांना नानक रोटी ट्रस्टच्यावतीने जेवणाचा डबा, पिण्याच्या पाण्याची बाटली आणि मास्क देण्यात आले.

1 हजार 239 प्रवाशांची व्यवस्था असताना त्यापेक्षा अधिक प्रवासी आजच्या गाडीने रवाना झाले आहेत. रविवारी सुद्धा आणखी एक गाडी सुटणार आहे. गुजरातसाठीही गाड्यांची मागणी होत आहे. त्यामुळे प्रशासनाचे गुजरात सरकारशी बोलणे सुरू आहे. गरजेनुसार अतिरिक्त गाड्यांचे नियोजन करण्याबाबत रेल्वे प्रशासनासोबतही चर्चा सुरू आहे, अशी माहिती अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.

अमरावती जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी आयआयटीच्या शिक्षणासाठी बंगळुरू आणि युपीएससी अभ्यासासाठी दिल्लीला गेलेले होते. त्या विद्यार्थ्यांना जिल्ह्यात परत आणण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्र्यांनी केजरीवाल यांच्याशी बोलणे सुरू आहे. पुण्यात असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अमरावतीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात पश्चिम बंगालमधील पाच ते सहा हजार मजूर आहेत. त्यांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी ममता बामर्जी यांच्याशी बोलणी सुरू आहे, अशी माहिती खासदार नवनीत राणा यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details