महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अंबादेवी देवस्थान : अमरावतीत भाविकांना मुख्य प्रवेशद्वारावरूनच दर्शन

धार्मिक स्थळे उघडण्याचा अद्यापही निर्णय झाला नसल्याने नवरात्री उत्सवात देखील मंदिर पहिल्यांदाच बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अमरावतीचे आराध्य दैवत असलेल्या अंबा देवीचे दर्शन भाविक मुख्य प्रवेशद्वारावरूनच घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

navratri in amravati
अंबादेवी देवस्थान : अमरावतीत भाविकांना मुख्य प्रवेशद्वारावरूनच दर्शन

By

Published : Oct 22, 2020, 11:37 AM IST

अमरावती - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सर्वच मंदिरं बंद आहेत. धार्मिक स्थळे उघडण्याचा अद्यापही निर्णय झाला नसल्याने नवरात्री उत्सवात देखील मंदिर पहिल्यांदाच बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अमरावतीचे आराध्य दैवत असलेल्या अंबा देवीचे दर्शन भाविक मुख्य प्रवेशद्वारावरूनच घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. किमान नवरात्रीच्या नऊ दिवस तरी देवीचे मंदिर उघडण्याची मागणी भाविकांनी केली आहे.

अंबादेवी देवस्थान : अमरावतीत भाविकांना मुख्य प्रवेशद्वारावरूनच दर्शन
अंबानगरी म्हणून ज्या जिल्ह्याची ओळख आहे, त्या अमरावतीतील अंबा देवी मंदिरात नवरात्रोत्सवात सर्वाधिक गर्दी असते. या नऊ दिवसांत अमरावतीच नाही, तर संपूर्ण विदर्भातील लाखो भाविक अंबा देवीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. मात्र यावर्षी कोरोनामुळे धार्मिक स्थळे बंद असल्याने नवरात्र उत्सवाचा उत्साह मावळला आहे.

मंदिर बंद असले, तरी अंबा देवीच्या दर्शनाला येणारे अनेक भाविक मंदिराबाहेरूनच देवीला डोळ्यात साठवत आहेत. मात्र त्यांना मुख्य प्रवेश द्वारावरूनच दर्शन घेऊन समाधन मानावं लागतंय.

ABOUT THE AUTHOR

...view details