अमरावतीच्या धामनगावातील कुंजवनीने परिस्थितीवर मात करत मिळवले 95 टक्के - study
परिस्तिथी कशीही असली तरी माणसात बुद्धिमत्ता आणि यश मिळविण्याची ताकत असल्यास यश नक्की मिळत हे कुंजवणी ने दाखवून दिलं आहे.
![अमरावतीच्या धामनगावातील कुंजवनीने परिस्थितीवर मात करत मिळवले 95 टक्के](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3506447-thumbnail-3x2-kunj.jpg)
कुंजवनीने परिस्थितीवर मात करत मिळवले 95 टक्के गुण
अमरावती - जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरात राहणाऱ्या गरीब कुटुंबातील कुंजवणी खडसे हिने अडचणींवर मात करत 10 वीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अनेकदा पुस्तक घ्यायलाही पैसे नसायचे. मात्र, अशा परिस्थितीतही हार न मानता जिद्दीने अभ्यास करणाऱ्या कुंजवणीला दहावीत ९५ टक्के गुण मिळाले आहेत. पाहूयात यासाठीचा कुंजवणीचा संघर्ष व्हिडिओच्या माध्यमातून.
कुंजवनीने परिस्थितीवर मात करत मिळवले 95 टक्के गुण