महाराष्ट्र

maharashtra

मेळघाटातील आदिवासी बांधवांची विशेष होळी; आठवडाभर चालतो जल्लोष

By

Published : Mar 29, 2021, 4:29 PM IST

Updated : Mar 29, 2021, 5:14 PM IST

आदिवासी बांधव वर्षभरात विविध सण-उत्सव साजरे करत असले तरी होळी हा त्यांचा सर्वात आवडीचा आणि पारंपारिक महत्वाचा सण आहे. कामधंद्यासाठी बाहेरगावी गेलेली मंडळी या सणानिमित्त आपआपल्या गावी परत येतात. होळी सणाची तयारी खूप दिवस अगोदरपासून सुरु केलेली असते.

आदिवासी बांधव
आदिवासी बांधव

अमरावती- जिल्ह्यातील मेळघाटात आदिवासी बांधवांची संख्या सर्वाधिक आहे. या आदिवासींचा होळी हा अंत्यत महत्त्वाचा सण आहे. जवळजवळ आठवडा भर आदिवासी बांधव होळी साजरी करतात. यात नवीन वस्त्र परिधान करून ढोल व बासरीच्या तालावर आदिवासी महिला व बांधव नृत्य सादर करतात. तर या ठिकाणी फगवा (पैसै) मागण्याची परंपरा आहे. यादरम्यान फगवा मागण्यासाठी गावबंदी केली जाते. ये - जा करणाऱ्याला अडवून त्यांच्यासमोर नेत्रदीपक नृत्य सादर करत फगवा घेतल्याशिवाय सोडले जात नाही.

मेळघाटातील आदिवासी बांधवांची विशेष होळी


रात्रभर चालते नृत्यू
होळी संपूर्ण पेटल्यानंतर आदिवासी बांधव कोरकू मुठवा देवाजवळ एकत्र जमतात. आडवा दोर धरुन स्त्रीया पुरुषांना अडवून “फगवा” मागतात. फगवा मिळाल्याशिवाय रस्ता सोडत नाहीत. याही वेळी स्त्री-पुरुष विशिष्ट प्रकारची गीतं गात नृत्य करत असतात. याला “होरयार नृत्य” असे म्हणतात. त्यानंतर पुरुष मंडळी एका भांडयात पैसे टाकतात. यालाच “फगवा” असे म्हणतात. त्यानंतर पुरुषांना जाण्यासाठी रस्ता दिला जातो. गावपाटलाच्या भेटीला हे सर्व लोक जातात. भोजनानंतर मुठवा देवाजवळ रात्रभर आदिवासी बांधव नृत्य करत असतात.

होळी आदिवासींसाठी महत्वाचा सण

आदिवासी बांधव वर्षभरात विविध सण-उत्सव साजरे करत असले तरी होळी हा त्यांचा सर्वात आवडीचा आणि पारंपारिक महत्वाचा सण आहे. कामधंद्यासाठी बाहेरगावी गेलेली मंडळी या सणानिमित्त आपआपल्या गावी परत येतात. होळी सणाची तयारी खूप दिवस अगोदरपासून सुरु केलेली असते. आदिवासी बांधव होळीनिमित्त नवनी कपडे, दागदागिने खरेदी करतात. घरांची साफसफाई करुन सजविली जातात. नृत्य करण्यासाठी आवश्यक ढोल, ताशे, टिमकी, बासरी इ.साहित्य डागडूगी केली जाते.

हेही वाचा -राज्यात 40 हजार 414 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 108 मत्यूंची नोंद

Last Updated : Mar 29, 2021, 5:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details