मेळघाट व्याघ्र प्रकल्पातर्फे पर्यटकांसाठी 'चिखलदरा दर्शन' बससेवा
चिखलदरा येथे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडून पर्यटकांसाठी अत्यंत माफक दरात 'चिखलदरा दर्शन' बस सेवा सुरु करण्यात आली आहे. या बसच्या माध्यमातून चिखलदरा येथील महत्त्वाचे निसर्गरम्य ठिकाणे फिरवण्यात येणार आहेत.
अमरावती -विदर्भाचे नंदनवन असलेले अमरावती जिल्ह्यातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आणि निसर्गप्रेमींना आकर्षित करणारे पर्यटनस्थळ म्हणजे चिखलदरा. या ठिकाणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडून पर्यटकांसाठी अत्यंत माफक दरात 'चिखलदरा दर्शन' बस सेवा सुरु करण्यात आली आहे. या बसच्या माध्यमातून चिखलदरा येथील महत्त्वाचे निसर्गरम्य ठिकाणे फिरवण्यात येणार असून ही बस सेवा दररोज सकाळी ८ वाजता आणि दुपारी २ वाजता पर्यटक माहिती केंद्र, चिखलदरा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी चिखलदरा येथे भेट देणाऱ्या पर्यटकांनी या बस सेवेचा वापर करून या सेवेला जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा, अशी आशा मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडून व्यक्त करण्यात आली.