महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीत सोयाबीनला आतापर्यंतचा मिळाला सर्वाधिक भाव... वाचा सविस्तर बातमी - सोयाबीनची आवक

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत काल १२.७९३ किंटल सोयाबीनची आवक झाली. यात सोयाबीनला अमरावतीत सर्वाधिक ६ हजार ८५१ प्रती क्विंटलपर्यंत भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. प्रथमच यंदाच्या सोयाबीन इतका भाव मिळालाने आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या घडामोडीने सोयाबीनचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती

By

Published : Nov 24, 2021, 10:03 AM IST

अमरावती- यंदा जून महिन्यात सोयाबीनला १० हजार रुपयापर्यंत भाव मिळाला होता. मात्र यंदाचे सोयाबीन बाजारात दाखल होताच सोयाबीनचे भाव पडले होते केवळ ३ हजार ५०० ते ५ हजारपर्यंत भाव होते. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढल्याने स्थानिक बाजारात सोयाबीनची दरवाढ दिसून आली. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत (Amravati Agricultural Produce Market Committee) काल १२.७९३ किंटल सोयाबीनची आवक झाली. यात सोयाबीनला अमरावतीत सर्वाधिक ६ हजार ८५१ प्रती क्विंटलपर्यंत भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. प्रथमच यंदाच्या सोयाबीन इतका भाव मिळालाने आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या घडामोडीने सोयाबीनचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

अमरावतीत सोयाबीनला आतापर्यंतचा मिळाला सर्वाधिक भाव..

मागील आठवड्यात दोन दिवस शहरात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी लागली होती. त्यामुळे तब्बल नऊ दिवस अमरावतीची कृषी उत्पन्न बाजार समिती बंद होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल विक्री बंद होता. दरम्यान सोमवारपासून पुन्हा ही बाजार समिती सुरू झाली आहे. सोमवारी बाजारात सोयाबीनला पाच हजार आठशे ते सहा हजार रुपये दोनशे भाव मिळाला होता. मात्र मंगळवारी पुन्हा भावामध्ये वाढ झाली आणि 6 हजार 300 रुपयांवरून 6 हजार 800 रुपयांपर्यंत तसेच उच्च दर्जाच्या सोयाबीनला सात हजार दोनशे रुपये पर्यंत इतका भाव मिळाला. सोयाबीनचे भाव वाढल्याने आता आवकही वाढली आहे. भाव स्थिर राहण्यास येत्या काही दिवसात सोयाबीनची आवक यापेक्षाही वाढण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details