अमरावती- दरवर्षी नवरात्रोत्सवा दरम्यान सोयाबीनचे पीक काढण्याच्या मार्गावर असते. परंतु, यावर्षी पावसाळा उशिरा सुरू झाल्याने पेरण्या लांबल्या होत्या. याचा परिणाम सोयाबीनच्या उत्पादनावर झाला आहे. सोबतच सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे सोयाबीनचे पीक हे सडण्याच्या मार्गावर आहे.
अतीवृष्टीमुळे अमरावतीत सोयाबीनचे पीक सडण्याच्या मार्गावर - amravati news
अमरावती जिल्ह्यातील यंदा पावसाळा उशिरा सुरू झाल्याने पेरण्या लांबल्या होत्या. याचा परिणाम सोयाबीनच्या उत्पादनावर झाला आहे. पाऊस सुरू असल्याने सोयाबीनचे पीक हे सडण्याच्या मार्गावर आहे.
नुकसान झालेले पीक दाखवताना
मागील वर्षापेक्षा यावर्षी पावसाने उशिरा हजेरी लावली आणि सतत पाऊस होत असल्याने शेतकरी चिंतेत आला आहे. सतत होणाऱ्या पावसामुळे सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. अमरावतील मंगरूळ चव्हाळा येथील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला शेंगा आल्या. मात्र, पावसामुळे पिक बहरत नसल्याची खंत शेतकऱ्याने व्यक्त केली आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना लागली आहे.
हेही वाचा - खासदार नवनीत राणांनी दांडिया प्रशिक्षणात गरब्याच्या तालावर धरला ठेका
Last Updated : Sep 29, 2019, 7:12 PM IST