महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

People Left Village In Amravati : अमरावतीतील लोकांनी पाण्यासाठी सोडले गाव; गावाबाहेर नागरिकांचे एल्गार आंदोलन - सावंगी मग्रापुर येथे पाणी प्रश्न

चांदुर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर या गावात नेहमीच पाणी टंचाई असते. ( people from Sawangi Magrapur village In Amravati ) अशातच आता या गावातील फक्त वार्ड नंबर एक मध्ये मागील २८ दिवसांपासून ग्रामपंचायतने पाणी पुरवठा केला नसून गावाच्या इतर भागात नियमित पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप करत येथील महिलांनी थेट गाव सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

अमरावतीच्या सावंगी मग्रापुर गावातील काही लोकांनी पाण्यासाठी सोडले गाव
अमरावतीच्या सावंगी मग्रापुर गावातील काही लोकांनी पाण्यासाठी सोडले गाव

By

Published : Feb 3, 2022, 1:20 PM IST

Updated : Feb 3, 2022, 5:00 PM IST

अमरावती -अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापुर या गावात नेहमीच पाणी टंचाई असते. ( Some people left In Amravati District ) अशातच आता या गावातील फक्त वार्ड नंबर एकमध्ये मागील २८ दिवसांपासून ग्रामपंचायतने पाणी पुरवठा केला नसून गावाच्या इतर भागात नियमित पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप करत येथील महिलांनी थेट गाव सोडण्याचा निर्णय घेतला आहे. येथील बांधवांचा एल्गार आंदोलन सुरू केले आहे. तात्काळ पाणी उपलब्ध करून दिल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी मागणी केली आहे.

आंदोलकाची प्रतिक्रिया

नागरिकांचा ठिय्या -

बुधवारी रात्रीपासून वार्ड नंबर एक मधील नागरिकांनी गावापासून दोन किलोमीटरवर जाऊन ठिय्या मांडला आहे. ( Sawangi Magrapur village water Issue In Amravati ) या भागात तब्बल २८ दिवसांपासून ग्रामपंचायतने पाणी पुरवठाच केला नसल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, गावात टाकण्यात आलेल्या पाईप लाईनमुळे त्या भागात व्यवस्थित पाणी पुरवठा होत नसल्याची माहिती गटविकास अधिकारी यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया

दुजाभाव होत असल्याने गाव सोडण्याची घेतली भूमिका -

गावातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी शासनाच्या वतीने पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून लवकर पाणी समस्या निकाली निघणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी सुधाकर उमक यांनी दिली. दरम्यान, आम्हाला मुद्दामहून पाणी दिले जात नाही. असा दुजाभाव होत असल्याने आम्ही गाव सोडून जात आहोत, अशी भूमीका येथील नागरिकांनी घेतली आहे.

हेही वाचा -पाकिस्तान,चीन, पेगासस अन् बेरोजगारीवर राहुल गांधींचे भाष्य, दिला मोठ्या धोक्याचा इशारा, वाचा सविस्तर....

Last Updated : Feb 3, 2022, 5:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details