अमरावती : सामाजिक न्यायभवनात विविध कामानिमित्त येणाऱ्या जनतेसाठी संपूर्ण महाराष्ट्रात उपहारगृह बांधण्यात आली ( Social Justice Bhavan Canteen Issue ) आहेत. परंतू ही उपाहारगृह मात्र सध्या धुळखात पडली आहेत. लोकोपयोगी वास्तूचा वापर भंगार सामान ठेवण्यासठी केला जात असल्याची माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज मेश्राम यांनी दिली आहे. राज्य शासनाने १ जानेवारीपर्यंत उपाहारगृहे सुरू न केल्यास भीमशक्ती संघटनेतर्फे प्रत्येक जिल्ह्यात लक्षवेधी आंदोलन करण्याचा इशारा भीमशक्तीचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष पंकज मेश्राम यांनी दिला राज्य शासनाला पाठवलेल्या निवेदनातून हा इशारा दिला ( Agitation Warning If Canteen Not Open ) आहे.
विशेष घटक योजना :राज्यात अनुसूचित जाती व बौध घटकांच्या सामाजिक व शैक्षणिक उन्नतीकरीता सन १९८१-८२ पासून विशेष घटक योजना राबविण्यात येत आहे. सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणा-या योजनांच्या अंमलबजावणी करीता एकूण ७ प्रादेशिक उपायुक्त, ३५ जिल्ह्यात सहाय्यक आयुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, त्याच प्रमाणे मागासवर्गीय बेरोजगारांना स्वयंरोजगाराकरीता अर्थसहाय्य करण्यासाठी जिल्हास्तरावर महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रविदास महामंडळ, वसंतराव नाईक भटक्या जमाती महामंडळ, क्षेत्रिय कार्यालय अभ्यासिका एकाच इमारतीत सुरू करण्याचा ऐतिहासीक क्रांतिकारी शासन निर्णय तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी १ जून २००६ रोजी घेतला.