अमरावती -राणा दांपत्य समाजात द्वेष पसरण्याचे काम करत असून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे Rana couple create rift in the society वक्तव्य सातत्याने या दांपत्याकडून होत आहे. तेव्हा राणा दांपत्यावर कायदेशीर कारवाई करावी. त्यांच्यावर गुन्हे नोंदवावे अशा मागण्यांसाठी जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी संघटनांसह शिवसेना आणि मुस्लिम ब्रिगेड मैदानात उतरले Social and political organizations aggressive आहेत.
सामाजिक, राजकीय संघटना आक्रमक खासदार नवनीत राणा आक्रमक -कथित लव जिहाद प्रकरणी Amravati Love Jihad Case खासदार राणा आक्रमक झाल्या होत्या. अमरावती शहरातील 19 वर्ष युवतीला एका मुस्लिम समुदायाच्या मुलाने फूस लावून पळवून नेल्याचे कैफियत एका मुलीच्या आई आणि भावाने खासदार राणा यांच्या पुढे मांडली होती. या प्रकरणावरून आक्रमक होत खासदार राणा यांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये Rajapeth Police Station आठवडा भरापूर्वी राडा घातला होता. अशातच ती युवती सातारा शहरातून अमरावतीत दाखल झाल्यानंतर मी माझ्या मर्जीने शिक्षणासाठी बाहेरगावी गेली होती असे बयाण पोलिसांना दिल्याने लव जिहाद प्रकरणामधील हवा पार निघून गेली होती. परंतु या सगळ्या प्रकरणात माझ्या मुलाची विनाकारण बदनामी करण्यात आल्याचा आरोप करीत खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलीस अधिकारी, कर्मचारी संघटना आक्रमक - खासदार नवनीत राणा MP Navneet Rana पोलिसांना अर्वाच्य भाषेत बोलून अपमानित करत आहेत. पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर केला जातो. खासदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून पोलिसांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांच्या भावना दुखावल्याचा आरोप पोलीस कर्मचाऱ्यांच्या संघटनेने केला आहे.
मुस्लिम ब्रिगेडही उतरली मैदानात -खासदार नवनीत राणा या पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करून जनसामान्य जनतेत पोलीस प्रशासनाविषयी अनादर पसरण्याचे काम करत असल्याचा आरोप केलाआहे. लोकप्रतिनिधी ह्या जनतेच्या सेवक असतात. मात्र त्या आपल्या पदाचा अवमान करत असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी एका निवेदनाद्वारे पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रकार -अधिकाऱ्यांना अभद्र बोलून व मुस्लीम समुदायाला लक्ष करून लव जीहादच्या नावावर वारंवार समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रकार केला जात आहे. कायदा व संस्थेला भेटीत झाल्याचा आरोप करीत खासदार निमित्ताने यांचे युद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या सर्व प्रकरणात पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंग काय भूमिका घेतील याकडे संपूर्ण जिल्हा वाशीयांचे लक्ष लागले आहे.