अमरावती - वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या विषयी समाज माध्यमावर आक्षेपार्ह प्रतिक्रिया टाकल्या प्रकरणी शनिवारी अकोला येथील सामाजिक कार्यकर्ते रजनीकांत यांना अमरावतीच्या दर्यापूरमध्ये भाजप नगरसेवक संतोष कोल्हेंसह अन्य दोघांनी मारहाण केली होती. ही मारहाण करणाने मोदी भक्तांप्रमाणेच प्रकाश आंबेडकरांचे अंध भक्त असून त्यांनी मला जीवे मारण्याची धमकीही दिली, असा आरोप मारहाण झालेले रजनीकांत यांनी केला आहे. आपण लवकरच या प्रकरणी अमरावतीला पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे
'मोदींच्या अंधभक्तांप्रमाणेच मला मारहाण करनारे प्रकाश आंबेडकरांचेही अंधभक्त' - अमरावती
त्यांनी मला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांनी एसटी डेपोत नेऊन मला बस मध्ये बसऊन दिले तुम्ही जर याची तक्रार केली तर तुमचे हातपाय तोडू , जीवे मारू अशी धमकीही दीली. जसे काही लोक मोदींचे अंधभक्त आहेत, तसेच मला मारहाण करनारे देखील प्रकाश आंबेडकरांचे अंधभक्त आहेत, असे रजनीकांत म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांच्या बदल आक्षेपार्ह प्रतिक्रिया टाकल्या प्रकरणी हा संपुर्ण प्रकार काल दर्यापूर येथे घडला होता .यावर प्रतिक्रिया देताना अमरावतीचे भाजप जिल्हाध्यक्ष म्हणाले नगरसेवक संतोष कोल्हे यांना आम्ही २०१७ मधेच पक्षातून निलंबित केले आहे. भाजपच्या उमेदवारी वर निवडुन आलेले नगरसेवक कोल्हे हे आजही भाजपाचेच नगरसेवक आहेत. त्यांना नगरसेवक सेवक पदा वरून काढले नाही, हे विशेष आहे.
याप्रकरणी मारहाण करणारे रजनीकांत म्हणाले मी काही कामानिमित्त दर्यापूर ला गेलो होतो. तेव्हा मी कोल्हे यांना फोन केला. ते एका हॉटेल मध्ये मला भेटायला आले. चर्चा सुरू असतानाच संतोष कोल्हे म्हणाले तूम्ही आमचे नेते असलेले प्रकाश आंबेडकर यांच्या बदल अशी प्रतिक्रिया का दिली, असा जाब त्यांनी मला विचारला. मी त्यांना म्हनालो प्रकाश आंबेडकर हे माझे उमेदवार आहेत. मी मतदार आहे, आणि मला त्याच्या बद्दल लिहण्याचा अधिकार आहे. असे म्हटल्यावर त्यांनी मला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांनी एसटी डेपोत नेऊन मला बस मध्ये बसऊन दिले तुम्ही जर याची तक्रार केली तर तुमचे हातपाय तोडू , जीवे मारू अशी धमकीही दीली. जसे काही लोक मोदींचे अंधभक्त आहेत, तसेच मला मारहाण करनारे देखील प्रकाश आंबेडकरांचे अंधभक्त आहेत, असे रजनीकांत म्हणाले.