अमरावती: सध्या सगळीकडे ई-कॉमर्स कंपन्यांवरुन वस्तु खरेदी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ई कॉमर्स कंपन्यांकडून खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विविध प्रकारच्या ऑफर्स या कंपन्यांकडून दिल्या जातात. कंपन्यांच्या पोर्टलवर आणि ॲपमध्ये दिसणारी तीच वस्तू आपण ऑर्डर केल्यानंतर मिळेल की नाही याची मात्र काही शाश्वती नसते. एका ग्राहकाने आघाडीच्या ई-कॉमर्स कंपनीकडून मोबाईल ऑर्डर केला आणि प्रत्यक्षात मात्र त्याला लक्स आणि लाईफ बॉय साबण आला आणि डमी मोबाईल आला. त्यामुळे ऑनलाइन शॉपिंग नको रे बाबा. असे म्हणण्याची वेळ या ग्राहकावर आली आहे.
ओरीजनल वन प्लस ऐवजी रेडमी :अमरावती जिल्ह्यातील चांदूररेल्वे शहरातील निलेश चंदाराणा यांनी कुटूंबातील एका सदस्याकरिता वन प्लस कंपनीचा २८ हजार ९९९ रूपये किंमतीचा २ टी ५ जी मोबाईल एका नामांकित ऑनलाईन शॉपींगव्दारे १७ जानेवारीला बूक केला होता. सदर मोबाईलचे पार्सल मिळाल्यानंतर त्यांनी २४ जानेवारीला डिलिव्हरी बॉय समक्ष पॅकींग उघडली. तेव्हा त्यामध्ये ओरीजनल वन प्लस कंपनीच्या मोबाईल ऐवजी रेडमी ९ हा डमी फोन आला. सोबत त्यात लक्स, लाईफबॉयचे साबन होते. हा प्रकार बघून निलेश चंदाराना हे अचंबित झाले. यानंतर त्यांनी डिलिव्हरी बॉयच्या माध्यमातून संबंधित कंपनीकडे तक्रार केली आहे. याप्रकरणाची चौकशी करून कंपनीने दोषींवर कारवाई करावी. तसेच नवीन मोबाईल देण्यात यावा अशी मागणी त्यांनी कंपनीकडे केली आहे.
दुकानातून खरेदी करावी :ऑर्डर केलेली वस्तू त्यामध्ये विविध प्रकारचे सूट दिले जाते. ऑनलाईनऐवजी प्रत्यक्ष दुकानातून खरेदी करा. ऑनलाईन मोबाईल ऑर्डर केल असता त्यात डमी मोबाईल व साबन आले. त्यामुळे ऑनलाईन शॉपींगमध्ये असलेली फसवणुक पाहता ग्राहकांनी ऑनलाईन ऐवजी दुकानातून वस्तूंची खरेदी करावी असे आवाहन निलेश चंदाराणा यांनी केले आहे. त्यामुळे ऑनलाइन शॉपिंग नको रे बाबा असे म्हणत ग्राहकांमध्ये चर्चेचा एकच विषय बनलेला आहे.