अमरावती - दर्यापूर मतदारसंघाचे भाजप उमेदवार रमेश बुंदीले यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची जाहीर सभा झाली. पाच वर्षाचा हिशोब घेऊन तुमच्यासमोर आली असून दिवाळीआधी काँग्रेस, राष्ट्रवादीची साफसफाई करण्याचे आवाहन स्मृती इराणी यांनी केले आहे.
दिवाळीआधीच काँग्रेस, राष्ट्रवादीची साफसफाई करा - स्मृती इराणी - daryapur assembly constituency
काँग्रेसवाले म्हणायचे चाय विकणारा पंतप्रधान बनणार नाही. पण, गरीब घरचा मुलगा पंतप्रधान झाला. 60 वर्षात कधीच कल्पना नाही केली की महिलांना एवढा सन्मान मिळेल, तो आता मिळाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 11 कोटी शौचालय बनवले. पाच वर्षांपूर्वी गरीबांच्या घरात चुली होत्या, आज उज्वलाचा गॅस आहे. तुम्ही आशीर्वाद देऊन मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवलं. 21 तारखेला बटन दाबायचा वेळेस विचार करा असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा - आता 'लोकांचंच ठरलंय', कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारच - शरद पवार
जे दिशाहीन आहे, ते महाराष्ट्राला काय दिशा देणार? असा सवालही इराणी यांनी विचारला. काँग्रेसने किती पैसा लुटला हे भारतीय जनता सांगेल, 65 वर्ष सत्तेत राहून शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी जागा देऊ शकले नाही. तसेच सावरकर यांचा अपमान करणाऱ्या लोकांना मतदान करु नका, असा आवाहनही त्यांनी यावेळी मतदारांना केले आहे.