अमरावती -जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात एकही कोरोना रुग्ण संख्या नाही. मात्र, येथे डेंग्यू आजाराची साथ सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. गेल्या सहा दिवसात तिवसा नगरपंचायतच्या हद्दीत तिघांचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे. तर दीड महिन्यात तालुक्यात सहा जणांचा डेंग्यूने मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.
- दीड महिन्यात तालुक्यात सहा जणांचा डेंग्यूने मृत्यू -
१९ ऑगस्ट रोजी तिवसा नगरपंचायतचे कर्मचारी सचिन देशमुख यांच्या १३ वर्षीय मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाला. कृष्णा सचिन देशमुख याला दोन दिवसांपूर्वी ताप आला होता. डेंग्यूची लागण झाल्याने त्याला अमरावती येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, सकाळी त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. १४ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देवांश प्रमोद वाट (१८ वर्ष रा. तिवसा) हा अमरावतीच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. मात्र, त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नातेवाईकांनी त्याचा मृतदेह पंजाबराव देशमुख रुग्णालयात देहदान करून एक आदर्श निर्माण केला. तर ८ ऑगस्ट रोजी शिक्षक कॉलनी येथील अजय विजय रेवतकर (वय ८ वर्ष) याचा देखील नागपूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला. तीन आठवड्यापूर्वी माधव नगर येथील भावना प्रकाश दौड (वय २५ वर्ष) या विवाहित महिलेचा देखील डेंग्यूने मृत्यू झाला. तिवसा ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर आताही रुग्ण असून, येथे आता बेडही अपुरे पडत आहेत.
- शहरात स्वच्छता होत असल्याचा नगरपंचायतचा दावा -
तिवसा नगरपंचायतवर गेल्या ८ महिन्यापासून प्रशासन आहे. त्यामुळे या ठिकाणचा कारभार पूर्ण वाऱ्यावर आहे. या ठिकाणी दररोज स्वच्छता केली जाते व शहर नियमित स्वच्छ केलं जातं, असा दावा नगरपंचायतच्यावतीने करण्यात येतो. मात्र, महिन्याला आठ ते दहा लाख रुपये खर्च स्वच्छतेवर करूनही शहर घाणीच्या विळख्यात अडकले आहे. तर नियमितपणे फवारणी करून स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची मागणी करण्यात येत आहे.
हेही वाचा -भाजप-शिवसेनेतील मतभेद कोणत्याही क्षणी दूर होऊ शकतात - प्रवीण तोगडिया
- पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतला होता आढावा -