अमरावती -केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत नाफेडच्यावतीने खरीप हंगाम 2020-21 या वर्षात तूर नोंदणी 28 डिसेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. यासाठी जिल्ह्यात सहा खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले असून शेतकऱ्यांनी तालुक्यातील केंद्राच्या ठिकाणी संपर्क साधून आपल्या तुरीची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी के. पी. धोपे यांनी केले आहे.
पणन विभागाने केल्या विविध सुचना -
शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी खरीप हंगाम 2020 मधील पिकपेरा नोंद असलेल्या तलाठ्याचा सही शिक्का, ऑनलाईन सातबारा, आधार कार्ड, बँक पासबूक खरेदी केंद्रावर सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच बँक पासबूकवर शेतकऱ्याचे नाव व बॅंक खाते क्रमांकासह आयएफसी कोड नमूद असावा, तसेच जनधन खाते किंवा परिसंस्थेतील खाते क्रमांक सादर करू नये, अशा सूचनाही पणन विभागाने दिल्या आहेत. खरेदी केंद्र असलेल्या तालुक्यातील व तालुक्याच्या जोडलेल्या खरेदी केंद्राच्या ठिकाणी तूर हमीभावाने खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहनही महासंघाने केले आहे.
हेही वाचा - कृषी आंदोलन : शेतकऱ्यांसोबत चर्चेची दहावी फेरी सरकारने पुढे ढकलली