अमरावती - येथे ३२ केव्ही लाईनचे जीवंत विद्युत तार अचानक जंगलातील जमिनीवर कोसळले. दरम्यान, येऊन जाणाऱ्या सहा म्हशींना या तारांचा धक्का लागल्याने या सहाही म्हशी घटनास्थळीच दगावल्याची घटना चिखलदरा तालुक्यातील तांडगा हरीसाल या गावाजवळील जंगलात घडली. या म्हशी दगावल्यामुळे गोविंद येवले या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर, महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप या शेतकऱ्याने केला आहे.
अमरावतीत विद्युत तारांचा धक्का लागून सहा म्हशी दगावल्या - high voltage wire news amravati
३२ केव्ही लाईनचे जीवंत विद्युत तार अचानक जंगलातील जमिनीवर कोसळले. दरम्यान, त्यावरून सहा म्हशी गेल्याने सहाही म्हशी घटनास्थळीच दगावल्याची घटना चिखलदरा तालुक्यातील तांडगा हरीसाल या गावनजीक असलेल्या जंगलात घडली.
जिवंत विद्युत तारांचा धक्का लागून सहा म्हशींचा दगावल्या
चिखलदरा तालुक्यातील तांडगा हरीसाल या गावातील शेतकरी येवले हे शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करत आहेत. दरम्यान आज(मंगळवार) सकाळी ते त्यांच्या सहा म्हशी जंगलात चराईसाठी घेऊन गेले. यावेळी जंगलात पडलेल्या 33 केव्ही विद्युत तारांचा स्पर्श होऊन त्यांच्या सहा म्हशी जागीच दगावल्या. या घटनेमुळे शेतकरी येवले यांचे दोन लाखांच्यावर नुकसान झाले आहे. तर, या घटनेप्रकरणी त्यांनी महावितरण विभागाच्या गैरजबाबदारपणाला कारणीभूत ठरवले आहे.