अमरावती- धारणी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी रात्री सिपना नदीला महापूर आला आहे. त्यामुळे नदीकाठी असलेल्या हरीसाल, धुनी आणि चिखली गावातील काही घरात पाणी शिरल्याची प्राथमिक माहिती आहे. या पुराच्या पाण्यामुळे कुठलीही हानी होऊ नये यासाठी तहसील प्रशासनाच्या वतीने ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हालविण्यात आले आहे.
मेळघाटातील सिपना नदीला महापूर; प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हालवले - Melghat
कालपासून अमरावती जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. अशातच मेळघाटमधील धारणी तालुक्यातील हरिसाल ते चौराकुंड दरम्यान वाहणाऱ्या सिपना नदीला महापूर आला आहे.
पुराचे दृष्य
कालपासून अमरावती जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. अशातच मेळघाटमधील धारणी तालुक्यातल्या हरिसाल ते चौराकुंड दरम्यान वाहणाऱ्या सिपना नदीला महापूर आला आहे. नदीवरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने सध्या पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. नद्या दुथडी भरून वाहत असल्याने प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. दरम्यान तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी हरिसालमध्ये पोहोचले आहेत.
Last Updated : Jul 29, 2019, 11:48 AM IST