महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिंधुताई सपकाळ यांनी उभारलेल्या आश्रम शाळेत आजही 50 विद्यार्थिनी पहातात उज्वल भविष्याचे स्वप्न - Chikhaldara Ashram Still Have Mai Thoughts

अनाथांची माय अशी ओळख ( Sindhutai Sapkal mother of orphans ) असणाऱ्या स्वर्गीय पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांची आज जयंती आहे. सामाजिक कार्याला अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या मेळघाटात सुरुवात झाली. तिथे मुलींच्या आयुष्याला वळण लावण्यासाठी आश्रमाची उभारणी त्यांनी केली होती.

Sindhutai Sapkal Ashram
सिंधुताई सपकाळ यांनी उभारलेले आश्रम

By

Published : Nov 14, 2022, 11:30 AM IST

अमरावती : अनाथांची माय अशी ओळख ( Sindhutai Sapkal mother of orphans ) असणाऱ्या स्वर्गीय पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या सामाजिक कार्याला अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या मेळघाटात सुरुवात झाली. मेळघाटातील चिखलदरा येथे 1992 साली सिंधुताई सपकाळ येथे निराधार चिमुकल्या मुलीसाठी पहिले आश्रम सुरू केले. आजही ह्या आश्रम शाळेतून एकूण 50 मुली ह्या उज्वल भविष्याचे स्वप्न रंगवित आहेत.

सिंधुताई सपकाळ यांनी उभारलेले आश्रम

अनाथांची आई अशी सिंधुताई सपकाळची ओळख : अनाथांची आई अशी ओळख असणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 मध्ये वर्धा येथे झाला होता. आयुष्यातील अनेक चढ-उतार पाहणाऱ्या सिंधुताई यांच्या सामाजिक कार्याला खऱ्या अर्थाने मेळघाटातील चिखलदरा येथे सुरुवात झाली. 1986 मध्ये त्यांनी निराधार बालकांसाठी पहिल्यांदा चिखलदरा येथे सामाजिक कार्यास सुरुवात केली. इंग्रज कालीन वाड्यात त्या भाड्याने राहात होत्या. याच वाड्यात 1992 साली त्यांनी पहिल्यांदा निराधार आणि अनाथ मुलींसाठी आश्रम शाळा सुरू केली होते. सुरुवातीच्या काळात चिखलदरा येथील आश्रम शाळेत आठ ते दहा मुली होत्या. या मुलींना शालेय शिक्षण देणे यासह भविष्यात येणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी या मुलीना सक्षम बनविण्याचे काम सिंधुताई सपकाळ यादी चिखलदरा येथे केले.

मुलींच्या समस्या अतिशय वेगळ्या :आदिवासी भाग असणाऱ्या या भागातील मुलींच्या समस्या या देशातील इतर प्रदेशातील मुलींपेक्षा अतिशय वेगळ्या होत्या. या समस्यांचा संपूर्ण अभ्यास करून सिंधुताई सपकाळ यांनी आदिवासी मुलींच्या भविष्याचा विचार करून आपल्या आश्रम शाळेत जगण्याचे स्वातंत्र्य मिळावे या उद्देशाने वाटचाल सुरू केली होती. चिखलदरा येथील आश्रम शाळेच्या माध्यमातूनच सिंधुताई सपकाळ येथून पुढे पुण्यात जाऊन समाजातील निराधार अनाथ मुलीच्या उद्धारासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले.


चिखलदराच्या आश्रमात आजही माईंचाच विचार :सिंधुताई सपकाळ यांचे चिरंजीव अरुण सपकाळ आणि त्यांच्या पत्नी सविता सपकाळ हे दोघे सिंधूताई सपकाळ यांचा सामाजिक वारसा जपत चिखलदरा येथील आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना उज्वला आयुष्य घडविण्यासाठी सिंधुताई सपकाळ यांच्या विचारांच्या माध्यमातून प्रयत्न करीत ( Chikhaldara Ashram Still Have Mai Thoughts ) आहेत. स्वतः सिंधुताई सपकाळ यांनी पहिल्यांदा स्थापन केलेल्या या आश्रम शाळेच्या नवीन इमारत बांधकाम कार्यास सिंधुताई सपकाळ यांच्या हयातीत सुरुवात झाली होती. वर्षभरापूर्वीच सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री हा अतिशय मानाचा पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसातच सिंधुताई सपकाळ यांचे निधन झाले.

50 मुलींना जगण्याची नवी दिशा :चिखलदरा येथील आश्रम शाळेच्या नूतनीकरणाचे काम काहीसे ठप्प झाले ( Fity Girls Lifes Direction ) होते. आता मात्र हे का पुन्हा नव्याने सुरू झाले असून या आश्रम शाळेत सध्या स्थितीत वास्तव्यास असणाऱ्या 50 मुलींना जगण्याची नवी दिशा मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे सिंधुताई सपकाळ यांचे पुत्र अरुण सपकाळ यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले. अरुण सपकाळ यांच्या पत्नी सविता सपकाळ या चिखलदरा येथील आश्रम शाळेत सिंधुताई सपकाळ यांचाच वारसा जपून ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे या आश्रम शाळेत पाहायला मिळते.

चिखलदऱ्यात सिंधताई सपकाळ यांनी उभारले श्रीकृष्णाचे मंदिर :14 नोव्हेंबर 1948 ला पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचा जन्म वर्धा जिल्ह्यात झाला होता. पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांनी, चिखलदरा येथे सुमारे तीस वर्षांपूर्वी श्रीकृष्णाचे मंदिर उभारले ( Sindhutai Sapkal Built Lord Krishna Temple ) होते. आज या मंदिराचा जिर्णोद्धार करून हे मंदिर नव्या स्वरूपात साकारले जात असल्याची माहिती अरुण सपकाळ यांनी ईटीव्ही भारत शी बोलताना दिली. अनेक अडचणीचा सामना करीत सामाजिक कार्य करणे अतिशय कठीण आहे. आमची आई सिंधुताई सपकाळ यांनी या सर्व संकटाचा मुकाबला यशस्वीपणे केला होता. अभी देखील आज त्याच्या स्मृतीला स्मरून सामाजिक कार्यात स्वतःला वाहूतळाचा प्रयत्न करीत असल्याचे अरुण सपकाळ म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details