अमरावती -शहरातील लालखडी परिसरातील जामेआ नगरातील एका मदरशात अल्पवयीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नव्हे तर, मदरशा प्रमुखानेच हे कृत्य केल्याचा आरोप झाला असून यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. मुफ्ती जिया उल्ला खान असे मदरशा प्रमुखाचे नाव आहे. यानंतर शहरातील नागपुरी गेट पोलिसात तक्रार दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या घटनेने शहरात एकच खळबळ उळाली आहे.
धामणगाव रेल्वे तालुक्यातील मुस्लिम अल्पवयीन मुलगी शहरातील लालखडी परिसरातील निवासी मदरसा येथे शिक्षण घेत होती. गेल्या महिन्यात २४ सप्टेंबर रोजी पीडितेला मदरसा प्रमुखाने एका खोलीत नेले. दरम्यान, मुलीने विरोध केला असता आरोपीने तिला मारहाण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर धास्तावलेली मुलगी आपल्या गावी गेली. त्यानंतर तिने घडलेला हा धक्कादायक प्रकार तिच्या आईला सांगितला. यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी सोमवारी रात्री पोलिसांत तक्रार दाखल केली.